पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू, वाहनांनी घेतला पेट

accident on Navale bridge या अपघातानंतर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला काही काळासाठी वाहतूक थांबवण्यात आली होती.

Accident On Navale Bridge

Three killed in horrific accident on Navale bridge in Pune, vehicles caught fire : पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून काही काळासाठी वाहतूक थांबवण्यात आली होती. या ठिकाणी तीन ते चार गाड्यांचा अपघात झाला. पण दोन मोठ्या कंटेनरमध्ये  कार चेपल्याने अपघात झाल्याने कार जळत होते. त्यामध्ये कुटुंब असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक जण गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

अधिकारी अन् उद्योगपतींना अर्ध्या दरात आलिशान घरं देण्याचं अमिष; 80 कोटींच्या फसवणुकीचा बीएमसी सहाय्यक आयुक्तांचा कट?

मुंबई-बंगळुरू महामार्गावर असलेल्या पुण्यातील कात्रजमधील नवले पुलावर हा अपघात झाला आहे. दोन मोठ्या कंटेनरमध्ये कार चेपली आणि त्यातील कारमधील पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच या अपघातानंतर या गाड्यांना प्रचंड मोठी आग भडकली. या दोन कंटेनरमध्ये एक कार दबली गेली. त्यामध्ये एक कुटुंब देखील होतं. अशी माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थली धाव घेतली.

कोपरगावमध्ये काळे-कोल्हेंमध्येच लढत ! काका कोयटे राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार

या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून 20 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नवले पूल या परिसरामध्ये नेहमीच भीषण अपघात होत असतात. नुकतचं गेल्या आठवड्यात एक अपघात झाला होता.

कंटेरनरमधील दोन आणि कारमधील पाच जणांचा मृत्यू
या घटनेत कंटेनरमधून दोन पुरुष व कारमधून दोन पुरुष व दोन महिला, एक मुलगी असे एकूण सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.एका मोठ्या कंटेनरने आग लागण्याआधी मागे बर्‍याच वाहनांना धडक दिली होती. त्यामध्ये ही अनेक जण जखमी झाले आहेत.याठिकाणी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह चार अधिकारी व जवळपास चाळीस जवान कार्यरत होते.

follow us