पुणे पोलिस दलात खळबळ… महिला API ला 28 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले…
Pune Police Female API पुणे पोलिस आयुक्तालयातच एका महिला अधिकाऱ्याला तब्बल 28 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
tir in Pune Police Force Female API caught red-handed while taking a bribe of Rs 28 lakh: पुणे शहर पोलिस दलाला हादरवणारी घटना समोर आली असून, पोलिस आयुक्तालयातच एका महिला अधिकाऱ्याला तब्बल 28 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुपत प्रतिबंधक विभाग (ACB) च्या पथकाने ही कारवाई केली.
आमिर खान, जुनैद खान आणि सुनील पांडे यांनी थिएटरमध्ये पोहोचून चाहत्यांना दिला सरप्राइज
सहायक पोलिस निरीक्षक (API) वैशाली तोटेवार असे या महिला अधिकाऱ्याचे नाव असून, त्या पुणे शहर पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होत्या. पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई लोहमार्ग येथे बढतीवर बदली झाल्याने त्यांना पुणे शहर पोलीस दलातून शुक्रवारी कार्यमुक्त करण्यात आले. नव्या पदावर रुजू होण्यापूर्वी महिला सहायक पोलीस निरीक्षकानी खासगी व्यक्ती मार्फत बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉनरेड जवळ २८ लाख घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. या घटनेनंतर या महिला पोलीस अधिकार्याची पोलीस आयुक्तालयातील रुमचा सर्च घेतला जात आहे. पोलिस आयुक्तालयाच्या आवारातच लाच स्वीकारताना त्यांना जेरबंद करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पुढं काय होईल सांगता येत नाही…, ठाकरे गटाला मोठा धक्का, खासदार साथ सोडणार?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात तोटेवार यांनी 28 लाख रुपयांची लाच स्वीकारली. मात्र ही लाच नेमकी कोणासाठी किंवा कोणत्या प्रकरणात घेतली जात होती, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. ACB कडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
एसपी घार्गे यांची कामगिरी कोणाच्या डोळ्यात खुपली? वर्षभरात बदली, नेमकं कारण काय?
या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे, तोटेवार यांची नुकतीच मुंबई येथील लोहमार्ग विभागात बदली झाली होती आणि त्यांना कार्यमुक्त देखील करण्यात आले होते. असे असताना त्यांनी लाच स्वीकारल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
40 कोटी रुपयांचा निवृत्ती वेतन दूरची गोष्ट, भारतीयांच्या कमी उत्पन्नामुळे उघड झालेली आर्थिक दरी
दरम्यान, ACB कडून आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपासात आणखी काय माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यांना पुणे पोलीस दलातून कालच कार्यमुक्त करण्यात आले. परंतु, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची या अगोदरच कारवाई सुरु झाली होती. त्यांनी एका तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये २८ लाखांची लाच मागितली होती. त्यात एका खासगी व्यक्ती मार्फत बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉनरेड येथे बोलवले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून २८ लाख रुपये घेण्यासाठी आलेल्या खासगी व्यक्तीला पकडले. पाठोपाठ वैशाली तोटेवार यांना ताब्यात घेतले. पाठापोठ दुसर्या दोन पथकांनी पोलीस आयुक्तालयातील त्यांच्या कार्यालयातील रुमची तर आणखी एका पथकाने त्यांच्या घराची झडती घेण्यास सुरुवात केली असून ही कारवाई अद्याप सुरु आहे.