एक्सवर YZ करणे बंद करा, नाहीतर…; थेट बांबू दाखवत वसंत मोरेंचा दुबेंना इशारा

Vasant More On Nishikant Dubey : हिंदीच्या सक्तीवरून (Hindi Compulsory) मराठी विरुद्ध हिंदी असा वाद राज्यात तापलेला असताना आता भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी मराठी लोक आमच्याच पैशांवर जगतात असं विधान केलं. तसेच हिंदी भाषिकांना मारता, पण तुमच्यात हिंमत असेल तर तमिळ, तेलगु भाषिकांनाही मारा, असं विधान मोरेंनी केलं. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी दुबे यांना चांगलाच दम दिला. एक्सवर पोस्ट करून वाय झेड करणं बंद करा, नाहीतर हातात असलेल्या बांबूचा वापर करावा लागेल, असा इशारा मोरे यांनी दिला.
जय शाह नंतर आयसीसीमध्ये आणखी एका भारतीयाची एन्ट्री, मिळाली मोठी जबाबदारी
आज माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, निशिकांत दुबे यांनी एक्सवर वायझेड करणं बंद करावं. मी पहिल्यांदा निशिकांत दुबे यांचं अभिनंदन करतो की, त्यांनी मराठी भाषेमध्ये पोस्ट केली. तसेच त्यांना ज्यांनी मराठी शिकवले, त्याचं देखील मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर दुबे यांनी आपटा-आपटीच्या गोष्टी शिवसैनिक आणि मनसैनिक यांना शिकवू नये. आम्ही आपटा-आपटी करत नाही, तर फोडाफोडी करतो. त्यामुळं आपटायचं असल्यास मुंबई, पुण्यात या, असं खुलं आव्हान मोरेंनी दिलं.
मराठी माणसांवर गरळ ओकली; खासदार निशिकांत दुबे कोण ?
मोरे म्हणाले, निशिकांत दुबे यांनी त्यांच्या मतदारसंघातून एक्स वर पोस्ट केली आहे. जर त्यांनी मुंबई किंवा पुण्यात पोस्ट केली असती तर त्यांना नक्कीच समजले असते. किरीट सोमय्या आणि केडिया यांनी काही विधाने केली होती. विधान केल्यावर काय होते, याबाबत दुबे यांनी त्या दोघांना एकदा विचारावं, असा सल्ला मोरे यांनी दिला.
मागील काही महिन्यांतील घटना पाहता, हा प्रांतावाद निर्माण प्रयत्न सुरू आहे. यातून दंगली घडवायच्या, त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न दिसतो, असंही मोरे म्हणाले.
मोरे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या एकत्रित मेळाव्यानंतर काही नेते मंडळी अस्वस्थ झाली. त्यातून ते अशी विधानं करत आहे. त्यामुळं भाजप नेतृत्वाने अशा वाचाळ वीरांना आवर घालावा. देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही त्यांना समजाऊन सांगू, पण अशी विधान रोखली पाहिजे अशा लोकांना वेळीच आवर घालावा, असं मोरे म्हणाले.
मोरे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर एका परप्रांतीय महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती महिला म्हणते की, चार-पाच दिवस दुकान बंद ठेवा, कोरोनासारखे यांचे हाल करू. मग त्यांना समजेल, असे ती महिला म्हणत आहे. पण मी तर सांगेन की, महिनाभर खुशाल दुकानं बंद ठेवा. कोणत्याही मराठी माणसाचं हाल होणार नाही. जर यांनी दुकान बंद केली तर मराठी माणसाचा जो सुरूवातीचा किराणा मालाचा व्यवसाय आहे, तो चांगल्या प्रकारे सुरू होईल, असं मोरे म्हणाले.
हातात फक्त बांबूच आहे. याआधी हातोड्याचा देखील वापर केला आहे. मारण्याची भाषा कोणी करत असेल तर उद्धव साहेब, राज साहेबांकडे जाण्याआधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या अंगावर यावं.. मातोश्री आणि शिवतीर्थ लांबच राहिलं. त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे यावं, मग आम्ही त्यांना आमच्या भाषेत सांगू, असा इशारा मोरे यांनी दिला.