आम्ही फक्त अॅक्शनला रिअॅक्शन दिली अन्… अजित पवार – भाजप वादावर मुरलीधर मोहळ स्पष्टच बोलले
Murlidhar Mohol Exclusive : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून या निवडणुकीत
Murlidhar Mohol Exclusive : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीत भाजप 125 जागा जिंकणार असा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आक्रमक प्रचार करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यातच त्यांनी लेट्सअप मराठीच्या (Letsupp Marathi) लेट्सअप विशेष या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत विजयाचा आकडा सांगितला आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत (Pune Municipal Corporation Election) अजित पवार (Ajit Pawar) यांनी अपेक्षापेक्षा जास्त आव्हान भाजपला दिला आहे का? असा सवाल खासदार मुरलीधर मोहळ यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत खासदार मुरलीधर मोहळ म्हणाले की, अजित पवार त्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवत असून त्यांचा अजेंडा राबवत आहे. त्यांना जे बोलायचं आहे ते बोलत असून अॅक्शनला रिअॅक्शन येत आहे. मात्र मला असं वाटत की, ही निवडणूक एकदम व्यवस्थित आणि कुठेही मतभेद न होता झाली असती तर चांगली झाली असती. पण ते बोलत असल्याने आमचे लोक बोलत आहे असं या मुलाखतीमध्ये खासदार मुरलीधर मोहळ म्हणाले. तसेच भाजपने या निवडणुकीत पातळी सोडून कोणावर टीका केली नाही असं देखील मुरलीधर मोहळ म्हणाले.
तर दुसरकडे या मुलाखतीमध्ये अजित पवार आणि महेश लांडगे (Mahesh Landge) वादावर देखील प्रतिक्रिया देत महेश लांडगे यांनी अॅक्शनला रिअॅक्शन दिली असं ते म्हणाले. अजित पवार यांनी महेश लांडगे यांच्यावर खूप काय बोलले होते त्यामुळे महेश लांडगे यांनी अॅक्शनला रिअॅक्शन दिली असं खासदार मुरलीधर मोहळ म्हणाले.
तर पुणे महापालिका निवडणुकी भाजप 120 ते 125 जागा जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
10 मिनिटांच्या डिलिव्हरी बंदीचा ‘क्विक कॉमर्स’ वर परिणाम काय? सोप्या शब्दात समजून घ्या सर्वकाही
पुणे महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यावेळी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असल्याची चर्चा राजकीत वर्तुळात सुरु असल्याने सर्वांचे लक्ष पुणे महापालिका निवडणुकीकडे लागले आहे.
