Kasba Bypoll : कसब्यातून भाजपची उमेदवारी मिळालेले हेमंत रासने Hemant Rasane कोण आहेत?
पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीने ही पोटनिवडणूक एकत्रित लढविण्याच ठरविल्याने सत्ताधारी भाजप समोर कडवी स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे दिवंगत आमदाराच्या जवळच्या नातलगांना उमेदवारी देण्याचा पायंडा कसब्यामध्ये मागे राहिला.
भाजपाने पिंपरी चिंचवड मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली. पण कसबापेठ (Kasba Bypoll) मतदारसंघात मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील उमदेवार देण्याऐवजी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी उमेदवारी दिली आहे.
Maharashtra | BJP releases list of its candidates for by-elections in Chinchwad & Kasba Peth Assembly constituencies. pic.twitter.com/wmQxCoranH
— ANI (@ANI) February 4, 2023
कसबा पेठ मतदारसंघातून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत भाजपमधील इतरही अनेक उमेदवार इच्छूक होते. पण भाजपने ऐनवेळी हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली आहे.
हेमंत रासने पुणे महापालिकेत भाजपचे नगरसेवक आहेत. याशिवाय पुण्यातील प्रसिद्ध अश्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट समितीचे ते ट्रस्टी देखील आहेत.
चार वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष
सध्या पुणे महापालिकेची मुदत संपली असली तरी मुदत संपण्याआधी हेमंत रासने पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. हेमंत रासने यांनी सलग चार वेळा पुणे स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांना सलग चार वेळा अध्यक्ष म्हणून संधी मिळाली, तहाही त्यांचा विक्रम आहे.