टेनिसपटू राफेल नदालचा टेनिसला अलविदा, निवृत्तीच्या घोषणेनं चाहत्यांना धक्का

टेनिस विश्वावर राज्य करणारा 22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदालने (Rafael Nadal) निवृत्ती जाहीर केली

  • Written By: Published:
Rafael Nadal

Rafael Nadal announces his retirement : दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने (Rafael Nadal) आज निवृत्ती जाहीर केली आहे. राफेल या हंगामानंतर व्यावसायिक टेनिसमधून (tennis) निवृत्ती घेणार आहे. त्याच्या या घोषणेमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, 38 वर्षीय टेनिस आयकॉन नोव्हेंबरमध्ये मालागा येथे होणाऱ्या डेव्हिस कप फायनलमध्ये स्पेनकडून खेळताना दिसणार आहे.

Pune Porsche Car : तीनशे शब्दांचा निबंध लिहायला सांगणारे बाल न्याय मंडळाचे ‘ते’ दोन अधिकारी बडतर्फ 

तब्बल 22 ग्रँडस्लॅम विजेतेपदं प्राप्त केलेल्या नदालने गुरुवारी एक व्हिडिओ जारी केला. त्यात याने निवृत्तीची घोषणा केली. आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आपल्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल राफेलने सर्वांप्रति कृतज्ञताही व्यक्त केली. या जीवनात प्रत्येक गोष्टीला सुरुवात आणि शेवट असतो. मला असे वाटते की, माझ्या कल्पनेपेक्षा मोठी आणि खूप यशस्वी कारकीर्द संपवण्याची हीच योग्य वेळ आहे, मी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेत आहे, असं नदालने नमूद केलं. तसेच, माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी माझी शेवटची स्पर्धा ही डेव्हिस कप फायनल असेल याबद्दल मी खूप उत्साहित आहे, असं तो म्हणाला.

Gulabi Teaser: ‘गुलाबी’ शहरात सुरु होणार नव्या मैत्रीचा प्रवास, ‘गुलाबी’चा धमाल टिझर प्रदर्शित 

राफेल नदाल पुढे म्हणाला की, मी आता व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेत आहे. गेली काही वर्षे माझ्यासाठी कठीण होती, विशेषत: गेली दोन वर्षे…

दरम्यान, स्पेनचा राफेल नदाल हा महान टेनिसपटूंपैकी एक आहे. राफेलला वयाच्या 14 व्या वर्षी रॅकेट देण्यात आले होते. त्याने वयाच्या आठव्या वर्षी टेनिस विश्वास पदार्पण केलं. तो आठ वर्षांचा असताना त्याने 12 वर्षांखालील वयोगटात विजेतेपद पटकावले होते.

राफेल नदालने त्याच्या कारकिर्दीत 22 ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला. वयाच्या 12 व्या वर्षापर्यंत तो टेनिस आणि फुटबॉल दोन्ही खेळला. पण नंतर या त्याने टेनिसचे विश्वच आपलेसे केले. त्याचे काका टोनी नदाल यांच्या सांगण्यावरून तो या क्षेत्रात आला आणि इतिहास घडवला.

follow us