Tamim Iqbal Retirement: विश्वचषकापूर्वी बांग्लादेश क्रिकेटमध्ये ‘मोठा भूकंप’

  • Written By: Published:
Tamim Iqbal Retirement: विश्वचषकापूर्वी बांग्लादेश क्रिकेटमध्ये ‘मोठा भूकंप’

Tamim Iqbal Retirement: एकदिवसीय विश्वचषक 2023 ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतीय भूमीवर खेळवला जाणार आहे. विश्वचषकाच्या तीन महिन्यांपूर्वी बांग्लादेश क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बांग्लादेश संघाचा कर्णधार तमिम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यासह 34 वर्षीय तमिम इक्बालची 16 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली. सध्या शाकिब अल हसन टी-20 फॉरमॅटमध्ये आणि लिटन दास टेस्ट फॉरमॅटमध्ये कर्णधार आहे. तमिम इक्बालनंतर एकदिवसीय संघाचा कर्णधार कोण असेल याची घोषणा अद्याप बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने केली नाही. (A ‘big earthquake’ in Bangladesh cricket before the World Cup, the captain retired)

पत्रकार परिषदेत तमीम लागला रडायला

बांग्लादेशला अफगाणिस्तान विरुद्ध चितगाव येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता, त्यानंतर तमिमने हे पाऊल उचलले आहे. तमिमने गुरुवारी चितगाव येथे पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. यावेळी तमीम खूप भावूक झाला होता आणि त्याचे डोळे ओले होते.

तमिम म्हणाला, ‘माझ्यासाठी हा शेवट आहे. मी माझे सर्वोत्तम दिले आहे. याच क्षणापासून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मी माझे सर्व सहकारी, सपोर्ट स्टाफ, बीसीबी अधिकारी, माझे कुटुंबीय आणि या प्रवासात माझ्यासोबत असलेल्या सर्वांचे आभार मानू इच्छितो.

तमिम म्हणतो, ‘मला चाहत्यांचेही आभार मानायचे आहेत. तुमचे प्रेम आणि विश्वास मला बांग्लादेशसाठी माझे सर्वोत्तम देण्यास प्रेरित करते. माझ्या आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी मला तुमचा पाठिंबाहवा आहे.

तमिम इक्बालने गेल्या वर्षी याच सुमारास T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो शेवटची कसोटी यावर्षी एप्रिलमध्ये आयर्लंडविरुद्ध खेळला होता. तसेच त्याने शेवटचा एकदिवसीय सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळला. तमिमने फेब्रुवारी 2007 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याच वर्षी, त्याने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतावर अर्धशतक झळकात बांग्लादेशला विजय मिळून दिला होता.

तमिमचा आंतरराष्ट्रीय विक्रम…

तमिमने 70 कसोटी सामन्यांमध्ये 38.89 च्या सरासरीने 5134 धावा केल्या ज्यात 10 शतके आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर तमिमच्या वनडेत 36.62 च्या सरासरीने 8313 धावा आहेत. तमिमने एकदिवसीय सामन्यांमध्ये 14 शतके आणि 56 अर्धशतके केली आहेत. तमिमने 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 24.08 च्या सरासरीने 1758 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये तमिमच्या नावावर एक शतक आणि सात अर्धशतके आहेत.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

तमिम हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपल्या देशासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. बांग्लादेशचा एकदिवसीय कर्णधार म्हणून तमीमची विजयाची टक्केवारी मशरफी मोर्तझापेक्षा थोडी जास्त आहे. तमिमने त्याच्या नेतृत्वाखाली बांगलादेशला 37 पैकी 21 सामने जिंकले. तमिमने 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात बांगलादेशचे नेतृत्वही केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube