AUS vs IND : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम शर्यतीतून टीम इंडिया बाहेर? आता समीकरण कसे आहे?

AUS vs IND : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम शर्यतीतून टीम इंडिया बाहेर? आता समीकरण कसे आहे?

WTC Final Scenario : इंदूर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) भारताचा 9 गडी राखून पराभव झाल्यानंतर, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत (WTC Final) पोहोचण्याचा त्यांचा मार्ग पुन्हा एकदा अत्यंत कठीण झाला आहे.

या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने एकीकडे अंतिम फेरीतील आपले स्थान पूर्णपणे पक्के केले आहे, (India vs Australia) तर दुसरीकडे भारतीय संघाला अंतिम फेरी गाठायची असेल, तर शेवटचा सामना जिंकणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियन संघाने 11 सामने जिंकून 68.52 टक्के गुणांसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या या दुसऱ्या आवृत्तीत आपले स्थान निश्चित केले. या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यातील पराभवानंतर, कांगारू संघासाठी शेवटच्या 2 सामन्यांपैकी एक सामना जिंकणे खूप महत्वाचे झाले होते. इंदूर कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली त्याने विजय मिळवून आपले स्थान पक्के केले.

इंदूर स्टेडियमच्या खेळपट्टीला आयसीसीकडून खराब रेटिंग, म्हणाले…

भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो

ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे, तिथे भारतीय संघाला स्थान मिळवण्यासाठी आता या समीकरणांचा अवलंब करावा लागणार आहे. सध्या टीम इंडिया 60.29 गुणांच्या टक्केवारीसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. जर भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील शेवटचा कसोटी सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर ते आपले स्थानही पूर्णपणे पक्के करणार आहे.

दुसरीकडे, शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला किंवा अनिर्णित राहावे लागले, तर श्रीलंकेच्या संघालाही अंतिम फेरी गाठण्याची आशा असणार आहे. यासाठी लंकेला आगामी न्यूझीलंड दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. श्रीलंकेचा संघ सध्या गुणतालिकेत ५३.३३ टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा पराभव करण्यात तो यशस्वी ठरला तर तो 61.11 गुणांच्या टक्केवारीसह WTC ची ही आवृत्ती पूर्ण करू शकणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube