टीम इंडियाचा आणखी एक पराक्रम, पाकिस्तानला मोठा धक्का; नेमकं काय घडलं?

टीम इंडियाचा आणखी एक पराक्रम, पाकिस्तानला मोठा धक्का; नेमकं काय घडलं?

Asia Cup 2023 : आशिया चषकातील सुपर 4 मध्ये भारताने पाकिस्तानचा (Asia Cup 2023) तब्बल 228 धावांनी पराभव केल्यानंतर टीम इंडियासाठी (Team India) आणखी एक गुडन्यूज मिळाली आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा हा मोठा विजय आहे. यामुळे नेट रनरेटच्या बाबतीत भारताला मोठा फायदा झाला आहे. पाकिस्तानचे (Pakistan) मात्र नुकसान झाले आहे. या विजयानंतर टीम इंडियाला दोन गुण मिळाले. श्रीलंका आणि पाकिस्तानचे प्रत्येकी दोन गुण आहेत. म्हणजेच आता तिन्ही संघांचे समान गुण झाले आहेत. मात्र, भारतीय संघाचा नेट रनरेट (+4.594) दोन्ही संघांपेक्षा चांगला आहे. ज्यामुळे टीम इंडिया आता गुणतालिकेत टॉपवर पोहोचली आहे.

याआधी पाकिस्तानचा (IND vs PAK) संघ या जागेवर होता. मात्र आता तो तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. श्रीलंका संघाची निव्वळ धावगती (Net Runrate) +0.420 आहे. पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे तर बांग्लादेश संघाचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.

IND vs PAK Asia Cup : भारताचा पाकवर आतापर्यंतचा ‘विराट’ विजय; कोहली, राहुलनंतर कुलदीपचाही पराक्रम

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील(Asia Cup 2023) लढत पावसामुळे रविवारी होऊ शकली नव्हती. ही लढत सोमवारी झाली. भारताने 24.1 षटकांपासून 2 बाद 147 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. विराट कोहली आणि केएल राहुलच्या शतकांच्या जोरावर भारताने 2 बाद 356 धावांवर मजल मारली. विराटने 94 चेंडूत 122 नाबाद धावा केल्या. तर राहुलने 106 चेंडूत 111 धावा केल्या. यानंतर पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाची मात्र चांगलीच दमछाक झाली. नियमित अंतराने विकेट पडत गेल्या. त्यामुळे टीम इंडियाने तब्बल 228 धावांच्या मोठ्या फरकाने पाकिस्तानचा पराभव केला.

आज श्रीलंकेशी टक्कर

पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर (Asia Cup 2023) टीम इंडियाचा उत्साह चांगलाच वाढला आहे. आज श्रीलंका संघाशी टक्कर (IND vs SL) होणार आहे. श्रीलंकेचा संघ या स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. फलंदाजी आणि गोलंदाची दोन्ही आघाड्यांवर संघ समतोल वाटत आहे. अशा परिस्थितीत आज भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत होणार आहे. या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

IND vs SL Playing 11 : टीम इंडिया सलग तिसऱ्या दिवशी मैदानात उतरणार, वर्कलोडमुळे असे होतील बदल? 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube