हॉकीच्या संघानेही करून दाखवलं! दक्षिण कोरियावर मात करत उपांत्य फेरीत धडक
Asian Champions Hockey : भारतीय पुरुष हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत दक्षिण कोरिया संघावर 3-2 अशी मात करत दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संघाने सलग चौथ्या वेळेस उपांत्य फेरी गाठली आहे.
या सामन्यात नीलकांता शर्मा याने फिल्ड गोल करत सहाव्या मिनिटालाच आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या सुंगह्यून किमने 12 व्या मिनिटाला फिल्ड गोल केला. दुसऱ्या क्वार्टरमध्य भारताने दुसरा गोल केला. हरमनप्रीत सिंगने 23 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर हा गोल केला. त्यानंतर मनदीप सिंगने आणखी एक गोल केला. त्यामुळे संघाला 3-1 अशी आघाडी मिळाली.
टीम इंडियाने पुन्हा जिंकलेली मॅच हारली, वेस्ट इंडिजचा सलग दुसरा विजय
दक्षिण कोरियाच्या जिहून यांग याने एक गोल केला त्यामुळे आघाडी कमी झाली. सामना संपायच्या काही मिनिटे आधी त्याने हा गोल केला मात्र, कोरियाला सामना काही जिंकता आला नाही. याआधी मलेशियाने जपानवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. मलेशियाचा अखेरचा साखळी फेरीचा सामना दक्षिण कोरियाविरुद्ध होणार आहे.
भारत-पाकिस्तान उद्या भिडणार
भारताचा अखेरचा साखळी फेरीचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना उद्या (बुधवार) होणार आहे. पाकिस्तान, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी अटीतटीची लढत होणार आहे. जपान-चीन, मलेशिया-दक्षिण कोरिया व भारत-पाकिस्तान अशा अखेरच्या लढती होणार आहेत.