Asian Games 2023 : महिला खेळाडूंनी इतिहास रचला; अन्नू राणी-पारुल चौधरीची सुवर्णपदकाला गवसणी

Asian Games 2023 : महिला खेळाडूंनी इतिहास रचला; अन्नू राणी-पारुल चौधरीची सुवर्णपदकाला गवसणी

Asian Games 2023 : भारताच्या अन्नू राणीने (Annu Rani) आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) इतिहास रचला आहे. अन्नू राणीने महिलांच्या भालाफेकमध्ये (javelin throw) सुवर्णपदक पटकावले. अन्नू राणीने 62.92 फेक करून सुवर्ण कामगिरी केली आहे. अशा प्रकारे भारताने दिवसातील दुसरे सुवर्णपदक जिंकले. प्रवीण चित्रवेलने (Praveen Chitravel) कांस्यपदक पटकावले. याशिवाय मोहम्मद अफसलने (Mohammad Afsal) 800 मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला पारुल चौधरीच्या (Parul Chaudhary) रुपाने पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. मध्यम अंतराची धावपटू पारुल चौधरी हिने सुवर्णपदक पटकावले आहे. पारुल चौधरीने 5 हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. पारुलने 5000 मीटर शर्यतीत 15 मिनिटे 14:75 सेकंद अशी वेळ नोंदवून पहिले स्थान मिळविले. भारतासाठी आजचे हे पहिले सुवर्णपदक होते. त्याचबरोबर आजच्या दिवसाता आत्तापर्यंत भारतीय खेळाडूंनी 5 पदके जिंकली आहेत.

टीम इंडियाच्या प्रॅक्टिस मॅच पावसाने धुतल्या; वर्ल्ड कपमध्ये असे होईल नुकसान

तेजस्वीन शंकरने रौप्यपदक पटकावेल
तेजस्वीन शंकरने रौप्यपदक पटकावले आहे. त्याने डेकॅथलॉनचा पुरुषांचा राष्ट्रीय विक्रमही मोडला आहे. त्याचबरोबर भारताने तब्बल 49 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील डेकॅथलॉन पदक जिंकले आहे. याआधी 1974 साली भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत शेवटचे पदक जिंकले होते.

कॅनोबोट शर्यतीत भारताला कांस्यपदक मिळाले. यानंतर प्रीतीने महिलांच्या 50-54 किलोग्रॅम बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. विथ्या रामराजने 55.68 मीटर अंतरासह भारताला तिसरे पदक मिळवून दिले. अशा प्रकारे, आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी 64 पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये 15 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. याशिवाय भारतीय खेळाडूंनी 24 रौप्य पदके आणि 26 कांस्य पदके जिंकली आहेत. सध्या पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube