Babar Azam : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप; बाबर आझमबाबत PCB ची सर्वात मोठी घोषणा
Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज मोठी घोषणा करत बाबर आझमला पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदी नियुक्ती दिली आहे.
Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज मोठी घोषणा करत बाबर आझमला पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदी नियुक्ती दिली आहे. बाबर आझम आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापासून संघाचा नेतृत्व करणार आहे. पीसीबीकडून वेस्टइंडिज आणि इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. पीसीबीने शान मसूदच्या जागी बाबर आझमची कर्णधारपदी नियुक्ती केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
शान मसूदने (Shan Masood) पाकिस्तानचे 16 कसोटी सामन्यांत नेतृत्व केले आणि त्यापैकी 12 सामन्यांत पाकिस्तान संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासात कोणत्याही कर्णधाराने आपल्या पहिल्या 16 पैकी 12 सामने गमावलेले नाही. मसूदला सलग सात कसोटी सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने त्याच्या जागी पीसीबी युवा खेळाडूला कर्णधार पदासाठी संधी देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र सर्वांना धक्का देत पीसीबीने पुन्हा एकदा बाबर आझमला (Babar Azam) कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे. बाबर आझमने पाकिस्तानचे 20 कसोटी सामन्यांत नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये 10 विजय, 6 पराभव आणि 4 सामने अनिर्णित राहिले आहेत. कसोटी कर्णधार म्हणून त्याची विजयाची टक्केवारी 50% इतकी आहे.
पाकिस्तान 25 जुलै ते 6 ऑगस्ट या कालावधीत वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर 19 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिज मालिकेसाठी 16 सदस्यांचा संघ निवडण्यात आला आहे, तर इंग्लंड मालिकेसाठी 17 सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड मालिकेसाठी सौद शकीलचा 17 वा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे, मात्र हे त्याच्या तंदुरुस्तीवर (फिटनेसवर) अवलंबून असेल. तर या संघात गोलंदाज अली उस्मान, फलंदाज मुहम्मद अवैस जफर, वेगवान गोलंदाज उबैद शाह आणि यष्टिरक्षक-फलंदाज मुहम्मद गाझी घोरी हे या संघातील आंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेले खेळाडू आहेत.
वेस्ट इंडिज मालिकेसाठी 16 सदस्यांचा संघ
बाबर आझम (कर्णधार), आमीर जमाल, अब्दुल्ला फझल, अली उस्मान, अझान ओवेस, इमाम-उल-हक, खुर्रम शहझाद, मोहम्मद अब्बास, मोहम्मद अली, मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), मोहम्मद ओवेस झफर, मुहम्मद गाझी घोरी (यष्टिरक्षक), साजिद खान, सलमान अली आगा, शान मसूद आणि उबैद शाहय
वेस्ट इंडिज मालिकेचे वेळापत्रक
25-29 जुलै – पहिली कसोटी, ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, तारोबा
2-6 ऑगस्ट – दुसरी कसोटी, क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
इंग्लंड मालिकेसाठी 17 सदस्यांचा संघ
बाबर आझम (कर्णधार), आमीर जमाल, अब्दुल्ला फझल, अली उस्मान, अझान ओवेस, इमाम-उल-हक, खुर्रम शहझाद, मोहम्मद अब्बास, मोहम्मद अली, मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), मोहम्मद ओवेस झफर, मुहम्मद गाझी घोरी (यष्टिरक्षक), साजिद खान, सलमान अली आगा, सौद शकील (फिटनेसच्या अधीन), शान मसूद आणि उबैद शाह.
‘हा’ आमदार फुटणार, शिंदे गटाकडून 20 कोटींची ऑफर; संजय राऊतांनी नावही सांगितलं
इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक
19-23 ऑगस्ट – पहिली कसोटी, लीड्स
27-31 ऑगस्ट – दुसरी कसोटी, लॉर्ड्स
9-13 सप्टेंबर – तिसरी कसोटी, बर्मिंगहॅम