ट्विटरचे मोठे पाऊल, दोन महिन्यांत भारतातील 23 लाखांहून अधिक खाते

ट्विटरचे मोठे पाऊल, दोन महिन्यांत भारतातील 23 लाखांहून अधिक खाते

Twitter Suspended : इलॉन मस्कने ट्विटरचे नाव बदलून एक्स केले आहे. मस्ककडे मालकी आल्यापासून ट्विटरमध्ये सातत्याने बदल होत आहेत. ट्विटरने भारतातील लाखो अकाऊंट्सवर बंदी घातली आहे. कंपनीने जून ते जुलै दरम्यान 23 लाख 95 हजार 495 खात्यांवर बंदी घातली आहे.

या खात्यांवर बंदी घालण्याचे मूळ कारण म्हणजे चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि नॉन-कंशेशुअल न्यूडिटी पसरवणे. याशिवाय देशात दहशत पसरवणाऱ्या 1,772 खाती ट्विटरने काढून टाकली आहेत. IT नियम 2021 नुसार, सर्व सोशल मीडिया कंपन्यांना या खात्यांवर बंदी घालण्याबाबत माहिती द्यावी लागेल.

जून ते जुलै दरम्यान, 3,340 वापरकर्त्यांनी तक्रार निवारण यंत्रणेच्या अंतर्गत तक्रारी केल्या आहेत. मात्र, काही दिवसांच्या विलंबानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा अहवाल महिन्याच्या पहिल्या तारखेला प्रसिद्ध व्हायला हवा होता, मात्र कंपनीने त्याची माहिती उशिरा दिली आहे. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा आणि व्हॉट्सअॅपने आधीच त्यांचे अहवाल प्रकाशित केले आहेत.

कोरोनाचे पुन्हा थैमान! एरिस व्हेरिएंटने वाढवली चिंता, 28 दिवसांत 80 टक्के केसेस वाढल्या

26 जून ते 25 जुलै दरम्यान, मायक्रोब्लॉगिंग साइटने 18 लाख 51 हजार 022 खात्यांवर बंदी घातली. या खात्यांमध्ये दहशतवाद कृत्य आढळून आलेल्या 2,865 खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान 2,056 भारतीय वापरकर्त्यांनी तक्रार निवारण यंत्रणेअंतर्गत तक्रारी केल्या आहेत.

इलॉन मस्कने आता ट्विटर X केले आहे. या प्लॅटफॉर्मचा लोगो आणि नाव दोन्ही बदलण्यात आले आहेत. यासोबतच मस्कने यावर कमाई सुरू केली आहे, ज्या अंतर्गत कंपनी जाहिरातींमधून मिळणाऱ्या कमाईचा काही भाग वापरकर्त्यांसोबत शेअर करत आहे.

किशोरी पेडणेकरांवर आर्थिक गुन्हे शाखेची वक्रदृष्टी, कोविड बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी बजावले समन्स

भारतातही कंपनीने अनेक यूजर्सना पेमेंट देण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय कंपनी लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ कॉलिंगचे फीचर जोडू शकते. खुद्द X च्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी ही माहिती दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube