लग्न लांबणीवर, कथित चॅट व्हायरल; स्मृती-पलाशच्या विवाहाबाबतच्या ‘त्या’ चर्चा खऱ्या की खोट्या

Smriti Mandhana And Palash Muchhal चा विवाह सोहळा लांबणीवर पडला त्यामुळे मात्र अनेक उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.

Smriti Mandhana And Palash Muchhal

Chat Viral Wedding Postpond Discussion about Smriti Mandhana And Palash Muchhal wedding true or false : गेल्या काही दिवसांपासून देशभरात महिला क्रिकेटर्स त्यांच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीने प्रचंड चर्चेत आल्या आहेत आणि याच दरम्यान आणखी एक चर्चा सुरू आहे. ती भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या विवाहाची. सांगलीमध्ये विवाहपूर्वीचे सर्वकाही कार्यक्रम व्यवस्थित सुरू असतानाच अचानक या लग्न सोहळ्यात एक ट्विस्ट आला. ज्यामुळे हा विवाह सोहळा सध्या लांबणीवर पडला आहे. यासाठी स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीचे कारण दिलं जात आहे. मात्र या दरम्यान सोशल मीडियावर मात्र अनेक उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे खरंच स्मृती मानधनाच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे हे लग्न लांबीवर पडले की, आणखी काही वेगळं आहे. हे लवकरच समोर येईल, मात्र या चर्चा नेमक्या काय आणि त्यांना दुजोरा देणाऱ्या घटना काय जाणून घेऊ…

लग्न लांबणीवर चर्चांना उधान

सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चांमध्ये स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुछाल याचे मेरि डिकॉस्टा नावाच्या मुलीशी अफेअर सुरू होतं. ज्याचं चॅट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातून पलाशने स्मृतीचा विश्वासघात केला आहे. धक्कादायक म्हणजे हे चॅट स्मृती सोबत लग्न नक्की झाल्यानंतरचे आहेत. असे एक ना अनेक तर्त लावले जात आहेत. मात्र या व्हायरल चॅट वरती अद्याप पलाश आणि स्मृती या दोघांनी देखील खुलासे केलेले नाहीत. मात्र या व्हायरल चॅटमुळे हे लग्न पुढे ढकललं गेलं आहे का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.

ऐन महापालिकांच्या तोंडावर लातूरमध्ये कॉंग्रेसला खिंडार; जवळच्या सहकाऱ्याच्या राष्ट्रवादी प्रवेशाने अमित देशमुखांना धक्का

सोशल मिडियावरील चर्चांना दुजोरा मिळणाऱ्या घटना समोर त्यामध्ये स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे. त्यांची अँजिओग्राफी झाली आहे. मात्र त्यामध्ये कोणतेही ब्लॉकेजेस मिळालेले नाहीत असे रिपोर्ट देखील समोर आले आहेत. तसेच या विवाह सोहळ्याबाबत उलट सुलट चर्चा होण्याचं आणखी एक कारण म्हणजे स्मृतीने आपल्या इंस्टाग्राम वरून हळद, मेहंदी आणि साखरपुडा यासारख्या सर्व विवाह संबंधित पोस्ट हटवल्या आहेत. मात्र दुसरीकडे तिने पलाश सोबतच्या जुन्या पोस्ट मात्र तशाच ठेवलेल्या आहेत त्यामुळे या पोस्ट हटवणे म्हणजे त्यांच्यामध्ये वाद आहे असं मानलं जाऊ शकत नाही. परिस्थितीनुसार तिने हा निर्णय घेतला असू शकतो.

कुणाला अर्थिक लाभ तर कुणाला प्रवासाचे योग; जाणून घ्या मेषपासून मीनपर्यंत आजचा दिवस कसा राहणार?

दरम्यान यावर माध्यमांशी बोलताना पलाश मुच्छलच्या आईने सांगितलं की, पलाश हा स्मृतीच्या वडिलांच्या खूपच जवळ आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. तसंच पलाशने निर्णय घेतला की, जोपर्यंत स्मृतीचे वडील बरे होत नाही तोपर्यंत फेरे घ्यायचे नाहीत. कारण ‘पलाशची स्मृतीच्या वडिलांशी जास्त अटॅचमेंट आहे. स्मृतीपेक्षा हे दोघं एकमेकांच्या जवळ आहेत. त्यामुळे स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे हे लग्न लांबीवर पडले की, आणखी काही वेगळं आहे. हे लवकरच समोर येईल

follow us