क्रिकेटविश्वात खळबळ! दिग्गज खेळाडूची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

क्रिकेटविश्वात खळबळ! दिग्गज खेळाडूची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

Tim Southee Retirement : क्रिकेटविश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. टीम साऊदीने (Tim Southee) न्यूझीलंडसाठी 2008 मध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत 102 कसोटी सामने खेळले असून 382 विकेट्स घेतल्या आहेत. साऊदीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंत कर्णधारपदाची जबाबदार टॉम लेथमकडे देण्यात आली होती. आता तर साऊदीने कसोटी क्रिकेटमधूनच निवृत्ती जाहीर केली आहे.

क्रिकेटविश्वात खळबळ! एकाच तासांत दोन कर्णधारांचे राजीनामे; नेमकं काय घडलं?

टीम साऊदी इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यानंतर तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. याआधी भारतात तीन कसोटी सामन्यांची मालिका झाली. या मालिकेत टीम साऊदी संघात होता. या मालिकेत न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा तीनही सामन्यात पराभव केला. तर या मालिकेच्या आधी घरच्या मैदानावर श्रीलंका संघाने न्यूझीलंडचा पराभव केला होता.

यावेळी टीम साऊदी संघाचा कर्णधार होता. या पराभवानंतर मात्र त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. कर्णधार नसताना झालेल्या भारता विरुद्धच्या मालिकेत टीम साऊदीने चांगली कामगिरी केली होती.

साऊदीच्या कसोटी क्रिकेट कारकि‍र्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने मार्च 2008 मध्ये कसोटीत पदार्पण केलं होतं. 14 वर्षांच्या करियरमध्ये साऊदीने एकूण 104 सामने खेळले होते. या सामन्यात त्याने एकूण 385 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत 300 पेक्षा जास्त विकेट आणि एकदिवसीय सामन्यांत 200 पेक्षा जास्त तसेच टी 20 क्रिकेटमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट साऊदीने घेतल्या आहेत.

World Cup 2023 : टीम इंडियाला पहिला धक्का! तुफानी खेळीनंतर रोहित बाद

follow us
  • fb
  • instagram
  • youtube