रोहित, विराटनंतर आणखी एका खेळाडूचा क्रिकेटला बाय बाय; लिहिली इमोशनल पोस्ट..

रोहित, विराटनंतर आणखी एका खेळाडूचा क्रिकेटला बाय बाय; लिहिली इमोशनल पोस्ट..

Priyank Panchal Retirement : आयपीएल स्पर्धांनंतर टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला (Priyank Panchal) रवाना होणार आहे. यासाठी बीसीसीआयने स्क्वॉडची घोषणा केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) दोघेही या दौऱ्यात दिसणार नाहीत. कारण त्यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ (Team India) इंग्लंडला भिडणार आहे. या दौऱ्याआधीच आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातकडून खेळणाऱ्या प्रियांक पांचाळने 35 वर्षांच्या वयात प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. प्रियांकने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 8 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. प्रियांकने या प्रकारात 250 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सन 2021 मध्ये प्रियांकला भारतीय संघात निवडण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात रोहित शर्मा जायबंदी झाल्यानंतर त्याच्या जागी प्रियांकचा समावेश करण्यात आला होता. परंतु, त्याला पदार्पण करण्याची संधी काही मिळाली नाही.

फक्त अडीच दिवसांत मॅच संपली! कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा धुव्वा; इंग्लंडचा दणदणीत विजय

प्रियांकची भावूक पोस्ट व्हायरल..

प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची माहिती प्रियांकने सोशल मीडियावर दिली. यात त्याने एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. ‘मोठे होताना प्रत्येक जण आपल्या पित्याकडे पाहतो. त्यांनाच आदर्श मानतो. त्यांच्यापासून प्रेरणा घेतो. त्यांना प्रभावित करण्याचाही प्रयत्न करतो. मी देखील याला अपवाद नाही. माझे वडील माझ्यासाठी दीर्घकाळ शक्तीचा स्त्रोत राहिले. त्यांनी मला स्वप्नं पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिलं.’

‘एका लहान शहरातून येऊन भारतीय संघाची कॅप परिधान करण्याचं धाडस मी केलं. मी प्रियांक पांचाळ तत्काळ (Indian Cricket) प्रभावाने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा करत आहे. हा एक भावनिक क्षण आहे तसाच हा क्षण मला नेहमीच कृतज्ञतेच्या भावनेने भरून देतो.’, अशा शब्दांत प्रियांक पांचाळने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyank Panchal (@panchalpriyank)

प्रियांकचं क्रिकेट करिअर..

गुजरात आणि वेस्ट झोनकडून खेळणाऱ्या प्रियांक पांचाळने 127 प्रथमश्रेणी क्रिकेट सामन्यांत 45.18 च्या सरासरीने 8 हजार 856 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 29 शतके आणि 34 अर्धशतके केली आहेत. तसेच गोलंदाजीतही प्रियांकने 16 विकेट्स घेतल्या आहेत. 97 लिस्ट ए सामन्यांमध्ये प्रियांकने 3 हजार 672 धावा आणि 59 टी 20 सामन्यांत 1 हजार 522 धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये प्रियांकच्या नावावर 8 शतक आणि 21 अर्धशतके आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube