FIDE Women’s World Chess Champion : महाराष्ट्राची लेक चमकली बुद्धिबळाच्या पटावर, 19 वर्षीय दिव्याने वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास

FIDE Women’s World Chess Champion :  महाराष्ट्राची लेक चमकली बुद्धिबळाच्या पटावर, 19 वर्षीय दिव्याने वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास

FIDE Women’s World Cup 2025 : महिला बुद्धिबळ (Chess) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दिव्या देशमुखने विजय मिळवला आहे.  कोनेरू हम्पीला हरवून दिव्याने (Divya Deshmukh) विजेतेपद पटकावले. FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला (FIDE Women’s World Cup 2025) ठरली. कोनेरू हम्पीला पुनरागमन करण्याची एक छोटीशी संधी होती, परंतु ती त्याचा फायदा घेऊ शकली नाही. दिव्याने शानदार विजय नोंदवला.

Video : धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याची चर्चा; खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं मोठं विधान

रविवारी बटुमी येथे झालेल्या महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने कोणतीही कसर सोडली नाही, उच्च रँकिंग असलेली ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला ड्रॉमध्ये रोखले. अंतिम सामना टायब्रेकरमध्ये नेला. दिव्याने सोमवारी जॉर्जियातील बटुमी येथे झालेल्या FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद जिंकण्यासाठी टायब्रेकरमध्ये हम्पीला हरवले.

दिव्या देशमुखने कोनेरू हम्पीला टायब्रेकमध्ये हरवून 2025 चा FIDE महिला विश्वचषक विजेता बनली. ती भारताची 88 वी ग्रँडमास्टर बनली. टायब्रेकमध्ये गेलेल्या ऑल-इंडियन फायनलमध्ये, दिव्याने हम्पीला 1.5-0.5 असा पराभव केला. पहिला रॅपिड गेम बरोबरीत सुटला. प दिव्याने ब्लॅक पीससह विजय मिळवून सामना जिंकला.

VIDEO : अजित पवार पहाटे उठतात, पण… हिंजवडीचे प्रश्न सुटणार का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल

दिव्याने अंतिम फेरीत प्रवेश करून कॅंडिडेट्स स्पर्धेत पात्रता मिळवली. आता ती FIDE महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे. परिणामी तिला थेट ग्रँडमास्टरचा किताब मिळाला आहे. महिला विश्वचषक विजेती आणि त्याच दिवशी एक नवीन ग्रँडमास्टर. भारतीय बुद्धिबळासाठी हा किती मोठा क्षण आहे. या अद्भुत कामगिरीबद्दल दिव्या, तिच्या संघाचे आणि तिच्या कुटुंबाचे अभिनंदन केलं जातंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या