Eoin Morgan : वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कॅप्टनचा क्रिकेटला अलविदा
लंडन : 21 व्या शतकातील इंग्लंडचा (England) यशस्वी कर्णधार इऑन मॉर्गनने (Eoin Morgan Retirement) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. 2019 चा विश्वचषक जिंकवून देण्यात त्याचे महत्वाचे योगदान होते. त्याने ट्विटद्वारे आपल्या निवृत्तीची माहिती दिली आहे. तसेच त्याने आपल्या मित्रांचे, कुटुंबातील सदस्यांचे, सहखेळाडूंचे आणि प्रशिक्षकाचे आभार मानले आहे.
इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 वनडे विश्वचषक स्पर्धेत त्याने मोलाची भूमिका बजावत इंग्लंड संघाला पहिला विश्वचषक जिंकून दिला होता. तसेच त्याने तीनही फॉरमॅटमध्ये इंग्लंड संघाला (England Cricket Team)मोलाचे योगदान दिले आहे.
Valentine Day Special : राजकारणातील लव्हस्टोरीज : प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड आणि नवनीत राणा
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने 10,858 धावा केल्या. यादरम्यान त्याने 16 शतके आणि 64 अर्धशतके झळकावली आहेत. यापूर्वी 27 जून 2022 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आता तो सर्वच प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्त झाला आहे. आता तो समालोचन करताना दिसून येऊ शकतो .
अनेकांना ही बाब माहित नसावी,इंग्लंड संघासाठी खेळण्यापूर्वी ओएन मॉर्गनने आयर्लंड संघासाठी पदार्पण केले होते. 2006 मध्ये त्याला पहिल्यांदा इंग्लंडची जर्सी घालून मैदानात उतरण्याची संधी मिळाली. त्याने इंग्लंड संघासाठी 248 वनडे सामन्यांमध्ये 39.3 च्या सरासरीने 8447 धावा केल्या. यादरम्यान त्याने 14 शतके आणि 47 अर्धशतके झळकावली.
तसेच 2009 मध्ये त्याला इंग्लंडच्या टी-20 संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने इंग्लंड संघासाठी खेळताना , 115 टी-20 सामन्यांमध्ये 28.6 च्या सरासरीने 1805 धावा केल्या. तर कसोटी क्रिकेटमधील 16 सामन्यांमध्ये त्याने 30.4 च्या सरासरीने १२७८ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ शतके देखील झळकावली आहेत.