Danielle Wyatt Gets Engaged : इंग्लंडच्या या महिला क्रिकेटपटूने निवडली जोडीदार, विराट कोहलीला लग्नासाठी केले होते प्रपोज !

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 03T105347.238

Danielle Wyatt Gets Engaged : इंग्लंड महिला क्रिकेट संघाची प्रसिद्ध खेळाडू डॅनिएल व्याटने दीर्घकाळ डेटिंग (Danielle Wyatt) केल्यानंतर जॉर्जी हॉजसोबत लग्न केल्याची घोषणा केली. T20 विश्वचषक 2023 संपल्यानंतर, इंग्लंड महिला क्रिकेट संघाची दिग्गज फलंदाज, डॅनिएल व्‍याटनेही तिची प्रतिबद्धता जाहीर केली. 2 मार्चच्या संध्याकाळी, तिने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे याची माहिती दिली की, तिची आणि जॉर्जी हॉजची एंगेजमेंट झाली.

व्याटने त्याच्या ट्विटर हँडलवर आपल्या जोडीदाराचे किस करतानाचे एक फोटो शेअर केला. 2014 मध्ये व्याटने टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) लग्नासाठी प्रपोज केले होते. मात्र, विराटने तिला नकार दिला. 2017 मध्ये कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma ) लग्न केले. डेनियल वॅट आणि जॉर्जी हॉज अनेक दिवसांपासून एकमेंकींना डेट करत होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Danielle Wyatt (@danniwyatt28)


डॅनिअल वॅट इंग्लंड महिला संघातील महत्वाची खेळाडू आहे. तर जॉर्जी सीएए बेस फुटबॉल महिला संघाची प्रमुख आहे. महिला टी 20 विश्वचषकाचा थरार संपल्यानंतर डॅनिअल वॅट हिने आपला साखरपुडा उरकला आहे. हा विश्वचषक डॅनिअलसारखी सरासरी राहिला आहे. तिला खास कामगिरी करता आली नाही. डॅनियल वॅट आणि जॉर्जीने अगोदर आपल्या नात्याला सार्वजनिक केले होते. सोशल मीडियावर दोघींचे अनेक फोटो आहेत. आज डॅनिअल वॅट हिने सोशल मीडियावर पोस्ट करत साखरपुड्याची माहिती दिली.

IND vs AUS 3rd Test: फिरकीच्या जाळ्यात फलंदाज अडकले, भारत पराभवाच्या उंबरठ्यावर

या पोस्टमध्ये डॅनियलने पार्टनर जॉर्जी हॉज हिच्याबरोबर किस करतानाच फोटो शेअर केला आहे. या फोटोत डॅनीच्या पार्टनरच्या हातात अंगठीदेखील दिसत आहे. “तू सदैव माझी” असे डॅनिअलने पोस्टमध्ये लिहिले आहे. डॅनिअल वॅट हिने इंग्लंड महिला संघासाठी १०२ वनडे आणि 143 कसोटी सामने खेळली आहेत. वॅटने वनडेत 1776 धावा पूर्ण केली आहे.

टीमध्ये 2369 धावांचा पाऊस पाडला आहे. तर गोलंदाजीत वॅटने हिने वनडेत 27 तर टी20 मध्ये 46 विकेट घेतल्या आहेत. डॅनियल वॅटने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदारप्ण केले होते. यानंतर मर्यादित षटकांच्या सामन्यात ती इंग्लंड संघाची महत्वाची सदस्य झाली. आपल्या अष्टपैलू खेळीच्या बळावर वॅटने अनेक सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून दिला.

Tags

follow us