Ashes 2023: ख्रिस वोक्सच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर कांगारू पहिल्या डावात 317 धावांत गारद

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 07 20 At 5.09.19 PM

Ashes 2023:  मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ 317 धावांत गारद झाला आहे. तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियासाठी केवळ 2 फलंदाजांनी पन्नास धावांचा आकडा पार केला. कांगारू संघाकडून मार्नस लॅबुशेनने 115 चेंडूत 51 धावा केल्या. तर मिचेल मार्शने 60 चेंडूत 51 धावांचे योगदान दिले. याशिवाय ट्रॅव्हिस हेडने 65 चेंडूत 48 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज स्टीव्ह स्मिथने 52 चेंडूत 41 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. (England Vs Australia 4th Test Emirates Old Trafford Manchester Ashes)

इंग्लंडकडून ख्रिस वोक्सची शानदार गोलंदाजी

इंग्लंडच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर ख्रिस वोक्सने सर्वाधिक 5 बळी घेतले. ख्रिस वोक्सने 22.2 षटकात 5 खेळाडूंना 62 धावा देत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने 14 षटकात 68 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय जेम्स अँडरसन, मार्क वुड आणि मोईन अली यांना 1-1 यश मिळाले.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी निराशा केली

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर उस्मान ख्वाजा पायचीत झाला तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ्याची धावसंख्या केवळ 15 होती. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नर 38 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले. मात्र, मिचेल स्टार्कने 93 चेंडूत 36 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

‘The: Trial’ फेम अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, ‘मी अन् काजोलने किसिंग सीन…’

ऑस्ट्रेलियन संघ मालिकेवर कब्जा करू शकेल का?

सध्या ऑस्ट्रेलियन संघ 5 कसोटी सामन्यांच्या ऍशेस मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडचा पराभव केला. मात्र, तिसऱ्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्सच्या संघाने शानदार पुनरागमन केले. तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इंग्लंडने पुनरागमन केले. मात्र, चौथी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियन संघाला मालिका आपल्या नावावर करायची आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघाला हा सामना जिंकून मालिकेत कायम राहण्याचा प्रयत्न करेल.

Tags

follow us