146 वर्षांचा इतिहास धुळीला मिळाला, इंग्लंड संघाचा लाजिरवाणा पराभव

146 वर्षांचा इतिहास धुळीला मिळाला, इंग्लंड संघाचा लाजिरवाणा पराभव

भारतामध्ये क्रिकेट ( Cricket ) या खेळाला साहेबांचा खेळ म्हणून ओळखले जायचे. पण कालांतराने हा खेळ भारताताच होऊन गेला. इंग्लंडच्या ( England ) संघाने पारंपारिक कसोटी खेळात आपले वर्चस्व कायम ठेवले. कसोटी खेळामध्ये इंग्लंडच्या संघाने अनेकवेळा अशक्यप्राय गोष्टी करून दाखवल्या आहेत. असे जरी असले तरी यावेळेस मात्र न्यूझीलंडच्या ( New Zealand ) संघाने एका धावेने त्यांचा पराभव केला आहे. या पराभवामुळे एका नवा रेकॉर्ड तयार झाला आहे. जो याआधी कधीही इंग्लंडच्या नावावर नव्हता.

इंग्लंडच्या संघाला मंगळवारी न्युझीलंडच्या संघाकडून फक्त एका धावेने पराभूत व्हावे लागले. न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडच्या संघासमोर 258 धावांचे लक्ष ठेवले होते. प्रत्युत्तरामध्ये इंग्लंडचा संघ 256 धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान या सामन्यात इंग्लंडच्या संघाने पहिला डाव 435 धावांवर घोषित केला होता. त्यावर न्यूझीलंडचा संघ 209 धावांवर बाद झाला. यानंतर इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला. फॉलोऑन घेऊन खेळताना न्यूझीलंडचा संघ 483 धावांवर बाद झाला. शेवटच्या डावामध्ये इंग्लंडला जिंकण्यासाठी 258 धावांची आवशक्यता होती. परंतू अवघ्या एका धावेने इंग्लंडच्या संघाचा पराभव झाला.

इंग्लंड संघाच्या या पराभवानंतर त्यांच्या नावावर एक लाजिरवाणा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा इंग्लंड टीमने फॉलोऑन दिल्यानंतर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यापूर्वी इंग्लंडच्या संघाने दोनदा फॉलोऑन खेळून ऑस्ट्रेलिया संघाला मात दिली आहे.

क्रिकटेच्या इतिहासामध्ये भारत व इंग्लंड असे दोनच देश आहेत की ज्यांनी फॉलोऑन खेळून विरुद्ध संघाला मात दिली आहे. इंग्लंडच्या संघाने दोन वेळा हा पराक्रम केला आहे. या यादीमध्ये आता न्यूझीलंडच्या संघाचा देखील समावेश झाला आहे.

फॉलोऑन म्हणजे काय?

कसोटी क्रिकेटमध्ये एक संघ जर पहिल्या डावात कमी धावा करुन सर्वबाद झाला तर, विरोधी संघ लगेचच बॅटिंग करता न येता लवकर बाद झालेल्या संघाला पुन्हा बॅटिंगसाठी निमंत्रण देतो. शक्यतो जो संघ फॉलोऑन देतो त्या संघाचा विजय हा निश्चित मानला जातो. याला अपवाद फक्त इंग्लंड व भारत हे दोनच संघ होते. त्यात आता न्यूझीलंडचा संघ देखील सामील झाला आहे.

(ठाकरेंची गाडी पुन्हा ‘वर्षा’वर न्यायची, नगरमधील ‘या’ बड्या नेत्याचं विधान)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube