हॉकी प्रेमींसाठी आनंदाची बातमी; तब्बल सहा वर्षांनंतर सुरु होणार हॉकी इंडिया लीग

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 13T164251.243

Hockey India League :  सहा वर्षांपासून स्थगित असलेली हॉकी इंडिया लीग पुढील वर्षीच्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे. हॉकी इंडियाने या लीगसाठी व्यावसायिक आणि विपणन भागीदारांची घोषणा केली आहे. आर्थिक कारणांमुळे 2017 मध्ये ही लीग रद्द करण्यात आली होती, परंतु आता हॉकी इंडिया लीग सुरू करण्यासाठी नवीन भागीदारांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

हॉकी इंडियाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, त्यांना ही लीग लवकरात लवकर सुरू करायची आहे, परंतु आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन (FIH) कडे पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत लीगसाठी मोकळा वेळ नाही. तोपर्यंत आमच्याकडे लीग सुरू करण्यासाठी भरपूर वेळ आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की म्हणतात की, हॉकी इंडिया लीग सुरू करणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असल्याने आज त्यांना खूप समाधान वाटत आहे.

Devendra Fadnavis ; ‘भेगा पडलेली वज्रमूठ आमचा सामना करु शकत नाही’

ही लीग पुढील वर्षी मार्च महिन्यात होऊ शकते, कारण फेब्रुवारीपर्यंत वेळ नाही आहे. मार्चमध्येही वेळ न मिळाल्यास येत्या काही महिन्यांत त्याचे आयोजन केले जाऊ शकते. लीगची सुरुवात 2013 मध्ये झाली असून तिचे आतापर्यंत पाच हंगाम झाले आहेत. रांचीच्या संघाने आत्तापर्यंत दोनदा विजेतेपद पटकावले आहे.

यूपीच्या गुंडांचा कर्दनकाळ ठरलेले अमिताभ यश आहेत तरी कोण?

मात्र, 2013 मध्ये पहिला हंगाम जिंकणारा संघ रांची रिन्होसने आता लीगमधून माघार घेतली असून रांची रेजने 2015 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. 2014 मध्ये दिल्ली, 2016 मध्ये पंजाब आणि 2017 मध्ये कलिंगाने विजेतेपद पटकावले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube