भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी; विजयासाठी बांग्ला टायगर्सने भारताला दिलं 257 धावांचंं टार्गेट

  • Written By: Published:
भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी; विजयासाठी बांग्ला टायगर्सने भारताला दिलं 257 धावांचंं टार्गेट

पुणे : पुण्यातील एमसीए मैदानावर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या बांग्लादेशच्या फलंदाजांनी कडवी झूंज देत भारतासमोर विजयासाठी 257 धावांचा डोंगर उभा केला आहे. सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये बांग्लादेशच्या फलंदाजांना बुमराहाच्या भेदक गोलंदाजीमुळे जोरदार फटकेबाजी करता आली नाही. बुमराहने 10 षटकात 41 धावा देत 2 बळी घेतले. तर, सिराज आणि जडेजानेही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बांग्लादेशने 50 षटकात 8 गडी गमावत भारतासमोर विजयासाठी 257 धावांचे लक्ष्य ठेवले. बांग्लादेशकडून हसन आणि लिटनने अर्धशतके झळकावली. (India Vs Bangladesh Match Update)

पहिल्या डावात काय घडले?

बांग्लादेशचा कर्णधार शकिब अल हसन दुखापतीमुळे हा सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी संघाचे नेतृत्व करणाऱ्या नझमुल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तंजिद हसन आणि लिटन दास यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये 63 धावा जोडल्या. बांग्लादेशची पहिली विकेट 93 धावांवर पडली. तंजिदने 43 चेंडूत 51 धावा केल्या. त्याला कुलदीप यादवने बाद केले. यानंतर कर्णधार नजमुल केवळ आठचं धावा करू शकला. तर, महेदी हसनने 3 तर, लिटन दास 66 धावा केल्या.

Ind vs Ban : स्टेडियम रिकामेच, मग तिकीटे गेली कुठे? संतप्त क्रिकेट चाहत्यांचा BCCI, MCA ला सवाल

बांग्लादेशची धावसंख्या 137/4 अशी असताना मुशफिकूर रहीमने तौहीद हृदयॉयसह डावाची धुरा सांभाळली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. शार्दुलने 16 धावांच्या स्कोअरवर तौहीदला बाद केले. तर, रहीम 38 धावांवर असताना बुमराहच्या भेदक गोलंदाजीवर बाद झाला. अखेरीस महमुदुल्लाहने 36 चेंडूत 46 धावा करत संघाची धावसंख्या 250 धावांच्या जवळ नेली. शरीफुलने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत बांग्लादेशची धावसंख्या 256 धावांपर्यंत नेली. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले. शार्दुल आणि कुलदीपला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

सामन्याच्या सुरूवातीलाच हार्दिक पांड्या जखमी 

विश्वचषकातील यंदाच्या हंगामातील 17 वा सामना भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यात पुण्यातील एमसीए मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गोलंदाजी करताना भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यानंतर त्याची उर्वरित बॉलिंग माजी कर्णधार विराट कोहली याने पूर्ण केली. त्यानंतर आता जखमी पांड्याला स्कॅनिंगसाठी रूग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यामुळे मैदानावर उपस्थित चाहत्यांसह अनेकांच्या काळजाचा ठोका चूकला आहे. नेमकं पांड्याला काय झालं आहे हे स्कॅनिंग रिपोर्ट आल्यानंतरच समोर येणार आहे.

‘तेव्हा मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याची अफवा पवारांनी का पसरवली?’, राणेंचा पवारांना थेट सवाल

पुण्यात इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्याचं टीम इंडियासमोर आव्हान

पुण्यातील एमसीए मैदानावर भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्या लढत होत आहे. विश्वचषकातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये पाकिस्तान, आफगाणिस्तान आणि बलाढ्य मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने भारतीय संघाचं मनोबल वाढलं आहे. मात्र, असे असतानाही भारतीय संघाला पुण्याच्या मैदानावर गेल्या दोन सामन्यांमध्ये झालेल्या इतिहासाची म्हणजेच उलटफेराची पुनरावृत्ती टाळण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube