भारताला झटका! आधी इतिहास रचला आज संघातूनच बाहेर; अश्विनच्या माघारीचं कारण काय ?
Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट (IND vs ENG Test) येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात काल दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन याने (Ravichandran Ashwin) इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे. यानंतर आता टीम इंडियाला धक्का देणारी बातमी आली आहे. रविचंद्रन अश्विनला तिसऱ्या कसोटीतून अचानक माघार घ्यावी लागली आहे. याबाबत बीसीसीआयने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
या सामन्यात अश्विनने शानदार गोलंदाजी केली. त्याने 37 धावा केल्या. तसेच इंग्लंडच्या जॅक क्रॉलीच्या भारताला पहिले यश मिळवून दिले आणि आपल्या 500 विकेट्सचा टप्पाही पूर्ण केला. पण आता अश्विन पुढील सामन्यात दिसणार नाही. त्याच्या कुटुंबात अचानक अडचण निर्माण झाल्याने त्याला सामना सोडून बाहेर पडावे लागले.
राजकोटमध्ये अश्विनने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारा 9वा गोलंदाज
याबाबत बीसीसीआयने एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. कठीण परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संघातील सर्व खेळाडू, सहकारी, कर्मचारी अश्विनच्या पाठिशी आहेत. खेळाडूंच्या कुटुंबियांनाही आम्ही पाठिंबा देतो. या कठीण परिस्थितीतून अश्विन आणि त्याचे कुटुंबीय बाहेर पडतील अशी अपेक्षा.
दरम्यान, टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) राजकोट कसोटीत (IND Vs ENG) इतिहास रचला आहे. अश्विनने कसोटीत 500 विकेटचा टप्पा गाठला आहे. अश्विनने 98 सामन्यात 500 विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याने इंग्लिश फलंदाज जॅक क्रॉलीला बाद करून कसोटीत ही कामगिरी केली. अशाप्रकारे कसोटीत 500 विकेट घेणारा अश्विन दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताचा माजी लेगस्पिनर अनिल कुंबळेने ही कामगिरी केली होती.
R Ashwin withdraws from the 3rd India-England Test due to family emergency.
In these challenging times, the Board of Control for Cricket in India (BCCI) and the team fully supports Ashwin.https://t.co/U2E19OfkGR
— BCCI (@BCCI) February 16, 2024
त्याचबरोबर कसोटीत 500 विकेट घेणारा तो 9वा गोलंदाज ठरला आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. मुथय्या मुरलीधरनच्या नावावर 800 कसोटी विकेट आहेत.
यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज शेन वॉर्न दुसऱ्या स्थानावर आहे. शेन वॉर्नच्या नावावर 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जिमी अँडरसन तर चौथ्या क्रमांकावर अनिल कुंबळे आहे. जिमी अँडरसन आणि अनिल कुंबळे यांच्या नावे अनुक्रमे 695 आणि 619 विकेट आहेत. यानंतर या यादीत स्टुअर्ट ब्रॉड, ग्लेन मॅकग्रा, कोर्टनी वॉल्श आणि नॅथन लायन यांच्या नावांचा समावेश आहे.
IND vs ENG: उर्वरित तीन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा, आकाश दीपला लॉटरी