भारत-वेस्ट इंडिजमध्ये रविवारी दुसरा T20, अशी असेल टीम इंडिया?
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी होणार आहे. दोन्ही संघ गयानामध्ये आमनेसामने असतील. पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजने भारतीय संघाचा 4 धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात टीम इंडिया पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. पण या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? तसेच, भारत-वेस्ट इंडिज दुसरा T20 सामना कुठे आणि कसा पहायचा ते पाहूया.
थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहावे?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना गयाना येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामना सुरू होईल. भारतीय चाहते भारत-वेस्ट इंडिज सामना डीडी स्पोर्ट्सवर थेट पाहू शकतात. याशिवाय, तुम्ही जिओ सिनेमा आणि फॅनकोडवर लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता. वास्तविक, चाहत्यांना फॅनकोडवर सामना पाहण्यासाठी पैसे द्यावे लागतील, परंतु डीडी स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमावर ते विनामूल्य पाहू शकतात.
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (क), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार
वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
काइल मेयर्स, ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (wk), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (सी), जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकील होसेन, अल्झारी जोसेफ आणि ओबेद मॅककॉय