Ind vs WI T20: पंड्याचं टेन्शन वाढलं! वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूंचे पुनरागमन
Ind vs WI T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी मालिकेतील निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडिया कॅरेबियन संघाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.
या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने नुकताच आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. निवड समितीने 2024 च्या टी-20 विश्वचषकाला ध्यानात घेऊन या संघाची निवड केल्याचे सांगितले आहे. दोन अनुभवी खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे. जाणून घेऊया वेस्ट इंडिजचा संघ.
T20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या टीमची घोषणा
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची T20 मालिका ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासाठी टीम इंडियाने आधीच आपला संघ जाहीर केला आहे. हार्दिक पंड्या टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
त्याचबरोबर वेस्ट इंडिजकडून रोव्हमन पॉवेलकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. वेस्ट इंडिजने नुकतीच 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यष्टिरक्षक फलंदाज शाई होप, शि
मरॉन हिटमायर आणि ओशाने थॉमस यांचा संघात समावेश आहे. त्याचबरोबर काइल मेयर्सला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आज तिसरी वनडे; दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’
दोन अनुभवी खेळाडू संघात परतले
वेस्ट इंडिजच्या संघात दोन अनुभवी स्टार्स परतले आहेत. शिमरॉन हेटमायर व्यतिरिक्त निकोलस पूरनचा संघात समावेश करण्यात आला आहे. निकोलस पूरनने अमेरिकेत नुकत्याच झालेल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये धमाकेदार मॅच-विनिंग इनिंग खेळली होती. त्याने 13 षटकार मारून एमआय न्यूयॉर्कला मेजर लीग क्रिकेटचे चॅम्पियन बनवले.
महाराष्ट्राच्या कारभाराचं कौतुक; तर राजस्थान, कर्नाटकचं उदाहरण देत काँग्रेसवर टीका
T20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ
रोव्हमन पॉवेल (सी), काइल मेयर्स (व्हीसी), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशान थॉमा