ऑलिम्पिक्ससाठी भारत सज्ज! भारतीय खेळाडूंच्या आजच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर

ऑलिम्पिक्ससाठी भारत सज्ज! भारतीय खेळाडूंच्या आजच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर

India at Olympics 2024 Schedule Today : पॅरिस ऑलिम्पिक्स स्पर्धेचं उद्घाटन (Paris Olympics 2024) झालं आहे. या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांत भारतीय खेळाडू सहभागी (India at Olympics 2024) होणार आहेत. या स्पर्धांचा थरार भारतीयांना अनुभवता येणार आहे. या स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंचे कोणते सामने होतील याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

पॅरिस ऑलिम्पिक्स स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सीन नदीच्या किनारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी हजारो प्रेक्षक उपस्थित होते. या प्रेक्षकांनीही आपापल्या देशांच्या खेळाडूंना टाळ्यांच्या कडकडाटात प्रोत्साहन दिलं. भारतीय खेळाडूंचं प्रतिनिधीत्व शरद कमल आणि पीव्ही सिंधू यांनी केले. या दोन्ही खेळाडूंनी भारतीय ध्वज हाती घेतले होते.

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात नवा ट्विस्ट; कुरिअर बॉयने ईडीवरच केले आरोप

आजपासून पॅरिस स्पर्धेत भारताची बॅडमिंटन मोहिम; पी. व्ही. सिंधूची नजर सलग तिसऱ्या पदकावर

उद्घाटन समारोहाच्या आधी भारतीय तिरंदाजीचं पथक रँकिंग राऊंडमध्ये अॅक्शनमध्ये होतं. यामध्ये महिला आणि पुरुष तिरंदाजांच्या संघांनी क्वार्टर फायनल फेरीत प्रवेश केला. या खेळाडूंनी ऑलिम्पिक्स स्पर्धेत भारताची विजयी सुरुवात केली. यानंतर आज दिवसभरात भारतीय खेळाडूंचे विविध सामने होणार आहेत. या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

27 जुलैच्या स्पर्धांचे वेळापत्रक

10 मीटर एअर रायफल शुटिंग
वेळ : दुपारी 12.30
अ‍ॅथलीट : अर्जुन बाबूत-रमिता जिंदल, संदीप सिंह

10 मीटर एअर रायफल शुटिंग
वेळ : दुपारी 2

10 मीटर एअर रायफल शुटिंग (पुरुष)
वेळ : दुपारी 2
अ‍ॅथलीट : सरबज्योत सिंह, अर्जुन सिंह चिमा

10 मीटर एअर रायफल शुटिंग (महिला)
वेळ : दुपारी 4
अ‍ॅथलीट : मनू बाकर, रिदम सांगवान

टेनिस डबल फर्स्ट राऊंड (पुरुष)
वेळ : दुपारी 3.30
अ‍ॅथलीट : रोहन बोपण्णा, एन. श्रीराम बालाजी

टेबल टेनिस प्रिलिमीनरी राऊंड (पुरुष)
वेळ : रात्री 7.15
अ‍ॅथलीट : हरमित देसाई

बॅडमिंटन सिंगल (पुरुष)
वेळ : रात्री 7.10
अ‍ॅथलीट : लक्ष्य सेन

बॅडमिंटन पुरुष डबल ग्रुप स्टेज
वेळ : रात्री 8
अ‍ॅथलीट : स्वस्तिक साईराज राणिकरेड्डी, चिराग शेट्टी

बॅडमिंटन महिला डबल ग्रुप स्टेज
वेळ : रात्री 11.50
अ‍ॅथलीट : तनिषा क्रास्टो, अश्विनी पोनप्पा

हॉकी पुरुष संघ
भारत विरुद्ध न्यूझीलंड
वेळ : रात्री 9

बॉक्सिंग महिला
वेळ : रात्री 12.02 (28 जुलै)
अ‍ॅथलीट : प्रीती पवार

रोईंग पुरुष सिंगल
वेळ : 12.30
अ‍ॅथलीट : बलराज पंवर

दरम्यान, भारताची महिला दुहेरीतील अनुभवी खेळाडू अश्विनी पोन्नाप्पा हिच्यासाठी पॅरिस ऑलिंपिक कदाचित शेवटची असेल आणि तिसऱ्याच वेळेस यशस्वी ठरण्याचे तिचे प्रयत्न असतील. नवोदित तनिशा क्रास्टो ऑलिंपिकमध्ये पदार्पण करत असून ती अश्विनीची दुहेरीतील साथीदार आहे. एकेरीतील खेळाडूंसाठी वाटचाल अडथळ्याची असली, तरी भारताची दुहेरी जोडी पदकासाठी दावेदार असेल. सात्विक-चिराग जोडीने यावर्षी पुरुष दुहेरीत दोन स्पर्धा जिंकल्या असून चार स्पर्धांची अंतिम फेरी गाठली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube