IND vs WI : वेस्ट इंडिजचा क्लीन स्वीप, गंभीरला वाढदिवसाची भेट, इंडियाने दिल्ली कसोटी जिंकली
सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला फक्त ५८ धावांची आवश्यकता होती आणि संघाकडे ९ विकेट्स शिल्लक होत्या.

Ind Vs WI India Won Delhi Test By 7 Wikets : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा कठीण दौरा २-२ असा बरोबरीत सोडवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने आता दिल्ली कसोटीच्या पाचव्या दिवशी वेस्ट इंडिज संघाचा ७ विकेट्सने पराभव करून सामना जिंकला आहे. यासह टीम इंडियाने मालिका २-० ने सहज जिंकली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला फक्त ५८ धावांची आवश्यकता होती आणि संघाकडे ९ विकेट्स शिल्लक होत्या. साई सुदर्शन आणि शुभमन गिलच्या रूपात भारतीय संघाला शेवटच्या दिवशी दोन धक्के सहन करावे लागले. पण केएल राहुलने एका टोकाला धरून खेळत राहिले आणि संघाला आणखी एक सहज विजय मिळवून दिला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिलाच कसोटी मालिका विजय आहे. याशिवाय, या विजयाद्वारे भारतीय संघाने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला त्याच्या वाढदिवसानिमित्त भेट दिली आहे.
INDvsWI 2nd Test, Day 5 | India (518/5 d & 120/3) beat West Indies [248 & 390 (f/o)] by 7 wickets to win the series 2-0 and add 12 points to their World Test Championship tally.
(Pic: BCCI) pic.twitter.com/in61oLcj7r
— ANI (@ANI) October 14, 2025
प्रथम फलंदाजी करताना भारताने आपला पहिला डाव ५ बाद ५१८ धावांवर घोषित केला. यशस्वी जयस्वालचे १७५ धावा आणि शुभमन गिलचे नाबाद शतक हे भारताच्या पहिल्या डावातील महत्त्वाचे घटक होते. प्रत्युत्तरात, जेव्हा वेस्ट इंडिज फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताने त्यांना पहिल्या डावात २४८ धावांत गुंडाळले आणि त्यांना फॉलोऑन करण्यास भाग पाडले.
अहमदाबादप्रमाणेच दिल्लीतही भारत डावाच्या विजयाचे लक्ष्य ठेवून होता. तथापि, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात शानदार कामगिरी करत ३९० धावा केल्या आणि भारतासमोर १२१ धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजकडून जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी शतके झळकावली. भारताकडून कुलदीप यादव सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने पहिल्या डावात पाच आणि एकूण आठ बळी घेतले. जडेजा आणि बुमराहने प्रत्येकी चार, तर सिराजने सामन्यात तीन बळी घेतले.