Ind Vs WI : अश्विन-जडेजाच्या जोडीने नावावर केला ‘हा’ विक्रम; मैक्ग्राथ-गिलेस्पीला टाकले मागे
Ravi Ashwin & Ravindra Jadeja Stats: भारतीय फिरकी जोडी रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. वास्तविक, रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने भारताकडून कसोटी सामन्यात 486 बळी घेतले आहेत. आता रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जोडीच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅग्रा आणि जेसन गिलेस्पी यांना मागे टाकले आहे. आता या भारतीय जोडीने ऑस्ट्रेलियन जोडीला मागे टाकले आहे. रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने भारताकडून कसोटी सामन्यात 468 बळी घेतले आहेत.
आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?
रवीचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या डॉमिनिका कसोटीत ५ बळी घेतले होते. तर रवींद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने 8 खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रवी अश्विनने कसोटीत ३३व्यांदा ५ बळी घेण्याचा पराक्रम केला. तसेच या ऑफस्पिनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 बळींचा आकडा पार केला.
Ashwin & Jadeja as a bowling pair has taken 486 wickets in Tests, overtook Mcgrath – Gillespie yesterday.
The greatest spin duo in Test history. pic.twitter.com/tvU2jl2BN8
— Johns. (@CricCrazyJohns) July 13, 2023
Double iSmart: ‘लाइगर’ नंतर पुरी जगन्नाथ घेऊन आले; आयस्मार्ट शंकरचा सिक्वल, मुंबईत शूटिंग सुरू…
यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियन जोडी ग्लेन मॅकग्रा आणि जेसन गिलेस्पीच्या नावावर होता. पण आता रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी पुढे गेली आहे. रवी अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या शानदार गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात अवघ्या 150 धावांवर गारद झाला. रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्याशिवाय मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना 1-1 विकेट घेण्यात यश मिळाले.