IND vs AUS 1st ODI : कसोटीनंतर वनडेचा धमाका ! हार्दिक पंड्याची मुंबईत होणार अग्निपरीक्षा
IND vs AUS 1st ODI : बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीनंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ (IND vs AUS) आता वनडे मालिकेमध्ये एकमेकांना भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांमधील वनडे मालिकेत पहिला सामना १७ मार्च दिवशी होणार आहे. (Australia) पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघात सर्वात मोठा बदल कर्णधारांमध्ये करण्यात आला आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या सामन्यामध्ये उपस्थित राहणार नाही, अशा परिस्थितीत संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) सोपवण्यात आला आहे.
तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स या संपूर्ण मालिकेमधून बाहेर पडणार आहे, अशा स्थितीत कांगारू संघाची कमान स्टीव्ह स्मिथच्या हाती राहणार आहे. ही पहिलीच वेळ असणार आहे जेव्हा हार्दिक पांड्या वनडेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. हार्दिक पांड्याने आतापर्यंत ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.
दुसरीकडे स्टीव्ह स्मिथ ५ वर्षांनंतर वनडेमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसून येणार आहे. स्टीव्ह स्मिथ २०१४ ते २०१८ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार होता. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्या रूपात ३ योग्य वेगवान गोलंदाज आहेत, टीम इंडियाला गरज पडल्यास कर्णधार हार्दिक पंड्याही मध्यमगती करू शकणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना १७ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता सुरू होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
पहा दोन्ही संघाचे खेळाडू
टीम इंडिया : इशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस सायनिस, जोस इंग्लिस, मिचेल मार्श, अॅश्टन आगर, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, शॉन अॅबॉट, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी.