शानदार! ज्युनियर आशिया चषक 2024 मध्ये भारताची हॅट्ट्रिक, चायनीज तैपेईचा 16-0 ने उडवला धुव्वा  

  • Written By: Published:
शानदार! ज्युनियर आशिया चषक 2024 मध्ये भारताची हॅट्ट्रिक, चायनीज तैपेईचा 16-0 ने उडवला धुव्वा  

Hockey Junior Asia Cup 2024 : ओमानमध्ये सुरु असलेल्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया चषक 2024 मध्ये (Mens Hockey Junior Asia Cup 2024) भारतीय संघाने (Team India) विजयाची हॅट्रिक केली आहे.  या स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या तिसऱ्या सामन्यात चायनीज तैपेईचा 16-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत शानदार एंट्री केली आहे.

या सामन्यात भारतीय संघाकडून  दिलराज सिंगने 4, सौरभ आनंद आणि रोसन कुजूरने प्रत्येकी 3-3 तर अर्शदीप सिंगने 2 आणि  तालम प्रियोबार्टा, शारदानंद तिवारी आणि अरिजित सिंग यांनी प्रत्येकी 1 – 1 गोल केला. सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने एक गोल केला तर दुसऱ्या क्वार्टरमध्ये 4 गोल करत पहिल्या हाफमध्ये चायनीज तैपेईवर 5-0 अशी आघाडी घेतली तर तिसऱ्या क्वार्टरमध्ये  8 गोल करत भारताने 13-0 अशी आघाडी घेतली होती. तर चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने 3 गोल करत हा सामना 16-0 ने जिंकला. भारतीय संघाने या स्पर्धेत पहिला सामना थायलंड विरुद्ध  11-0 ने जिंकला होता तर दुसऱ्या सामन्यात जपानवर 3-2  ने मात केली होती.

पुरुष हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धा आतापर्यंत भारतीय संघाने चार वेळा जिंकली आहे. भारतीय संघाने  2004, 2008, 2015 आणि 2023 मध्ये पुरुष हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धा जिंकली होती.

पाकिस्तान घाबरला, चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलवरच, जाणून घ्या बैठकीत ठरलं तरी काय? 

तर दुसरीकडे पुरुष हॉकी ज्युनियर आशिया चषक 2024 मध्ये 10 संघाने भाग घेतला आहे.  ज्यामध्ये पूल अ मध्ये भारतासह कोरिया, जपान, चायनीज तैपेई आणि थायलंड यांचा समावेश आहे. तर ब गटात पाकिस्तान, मलेशिया, बांगलादेश, ओमान आणि चीन यांचा समावेश आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या