नववर्षात भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाकडून 3-0 ने उडाला धुव्वा
INDW vs AUSW : 2024 च्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून (INDW vs AUSW) लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 190 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या पराभवासह भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप झाला आहे. 2007 पासून भारताला आपल्याच घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला हरवता आलेले नव्हते.
टीम इंडिया 148 धावांवर ऑलआऊट झाली
या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 7 बाद 338 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 339 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि 32.4 षटकात 148 धावा करून सर्वबाद झाला. भारताकडून स्मृती मंधानाने सर्वाधिक 29 धावांची खेळी केली.
मोठी बातमी! सरकार आणि वाहतूकदारांमध्ये समेट! ट्रक चालकांना संप मागे घेण्याचे आवाहन
लिचफिल्डने 119 धावांची खेळी केली
ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर फोबी लिचफिल्डने सर्वाधिक 119 धावांची खेळी केली. हिलीसोबत तिने पहिल्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची ही सर्वोच्च सलामीची भागीदारी ठरली. लिचफिल्डने 125 चेंडूंत 16 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 119 धावा केल्या. हीलीने 85 चेंडूंत 4 चौकार आणि तीन षटकारांसह 82 धावा केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वनडेतील सर्वोच्च धावसंख्याही बनवली.
आंध्र प्रदेशात रेड्डी बहीण-भाऊ वेगळे का झाले? काँग्रेसला मिळणार संजीवनी
घरच्या मैदानावर विजय मिळाला नाही
या पराभवामुळे भारतीय संघ आणखी खच्ची झाला आहे. ऑस्ट्रेलियाला आपल्याच घरच्या मैदानावर वनडेमध्ये पराभूत करण्यासाठी भारतीय महिला संघाची गेल्या 16 वर्षांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. भारतीय भूमीवर एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा हा सलग दहावा विजय आहे. 2007 पासून भारताला आपल्याच घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला हरवता आलेले नाही.