IPL 2023 : गुजरात टायटन्सच्या 3 गोलंदाजांनी 79 विकेट घेतल्या आणि एकट्या शुभमनने 851 धावा केल्या, अशी लिहिली विजयाची स्क्रिप्ट

  • Written By: Published:
IPL 2023 : गुजरात टायटन्सच्या 3 गोलंदाजांनी 79 विकेट घेतल्या आणि एकट्या शुभमनने 851 धावा केल्या, अशी लिहिली विजयाची स्क्रिप्ट

IPL 2023 :  गुजरात टायटन्सने चमकदार कामगिरी करत IPL 2023 च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. संघाच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. गुजरातच्या विजयात फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. या हंगामात संघाच्या तीन गोलंदाजांनी मिळून आतापर्यंत एकूण 79 विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी एका फलंदाजाने एकट्याने 851 धावा केल्या. गुजरातच्या विजयात या खेळाडूंचा सर्वात मोठा वाटा राहिला

गुजरातसाठी शुभमनने 16 सामन्यात स्फोटक फलंदाजी करताना 851 धावा केल्या. या मोसमात त्याने 3 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली. शुभमन संघाला चांगली सुरुवात करून देण्याची रणनीती अवलंबत होता. ही जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली.

चेन्नईचे फायनलसाठी ‘घातक’ अस्त्र तयार, प्रत्येक मोठ्या सामन्यात दाखवतोय ताकद

गुजरातचे तीन गोलंदाज मोहम्मद शमी, राशिद खान आणि मोहित शर्मा यांनी मिळून 79 बळी घेतले. हे तिघेही या मोसमात सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहेत. शमी पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 28 विकेट घेतल्या आहेत. राशिद खानने 27 विकेट घेतल्या आहेत. तर मोहितने 24 विकेट घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मोहित शर्माने शानदार गोलंदाजी केली. त्याने 2.2 षटकात 10 धावा देत 5 बळी घेतले. मोहितने मुंबई इंडियन्सचे कंबरडे मोडले.

संपूर्ण मोसमात गुजरातने आक्रमक खेळ केला. त्याचा त्याला खूप फायदा झाला आहे. 14 साखळी सामन्यांनंतर संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. तसेच या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचणारा हा पहिला संघ ठरला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube