IPL 2023 : मुंबईमधून बुमराह आऊट; ‘हा’ खेळाडू गाजवणार मैदान

IPL 2023 : मुंबईमधून बुमराह आऊट; ‘हा’ खेळाडू गाजवणार मैदान

Mumabi Indians Replace Jasprit Bumrah :  आयपीएलच्या 16 व्या हंगामाला आज सुरुवात होणार आहे. गतवर्षीची विजेती टीम गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघामध्ये आज सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. पण यावेळेस प्रेक्षकांना आपला आवडता खेळाडू जसप्रीत बुमराहला पाहता येणार नाही. याचे कारण बुमराह हा गेल्या काही काळापासून दुखापतग्रस्त आहे.

बुमराह हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. मुंबई इंडियन्स संघाच्या प्रमुख खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. पण यावेळेस मात्र तो खेळू शकणार नाही. त्याच्या जागेवर आता मुंबईच्या संघाने दुसऱ्या खेळाडूच्या नावाची घोषणा केली आहे. तसचे दिल्ली कॅपिटल्सकडून रिषभ पंत देखील खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागेवर देखील दुसऱ्या खेळाडूचे नाव चर्चेत आहे. रिषभ हा अपघातामुळे आणखी काही काळ क्रिकेट खेळू शकणार नाही.

PHOTOS : पंतप्रधान मोदींची नव्या संसदेला भेट; कशी असणार रचना

मुंबई इंडियन्सच्या संघाने जसप्रीत बुमराहच्या जागेवर वेगवान गोलंदाज संदीप वॉरियरचा आपल्या संघात समावेश केला आहे. संदीपने 2021 साली भारतासाठी पदार्पण केले आहे. तसेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील आपली चुणूक दाखवली आहे. तो सध्या 31 वर्षाचा असून याआधी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघाचा भाग होता. आत्तापर्यंत त्याने 6 सामन्यात 2 विकेट घेतल्या आहेत.

IPL 2023 : सलामीचा सामना गमावलेल्या संघाने जिंकलंय दोनदा जेतेपद; काय सांगतात आकडे

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने रिषभच्या जागेवर अभिषेक पोरेला या खेळाडूचा संघात समावेश केला आहे. अभिषेक याने बंगालकडून 3 लिस्ट सामने खेळले आहेत. त्याला 20 लाख रुपयांमध्ये दिल्लीने आपल्याकडे घेतले आहे तर संदीपला मुंबईने 50 लाख रुपयांमध्ये घेतले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube