IPL 2023 : एका चुकीमळे 6 कोटी लोक IPL ला मुकणार

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 31T164559.697

IPL 2023 :  आयपीएलच्या 16 व्या हंगामाला आज सुरुवात होणार आहे. गतवर्षीची विजेती टीम गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघामध्ये आज सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलचे फॅन हे फक्त देशातच नसून संपूर्ण जगभरात आहेत. जगभऱातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत खेळत असतात. पण यावेळेस मात्र एका देशातील लोक हे आयपीएल पाहण्यापासून मुकणार आहेत. त्यांना या वर्षी आयपीएल पाहता येणार नाही.

आयपीएल पाहता येणार नाही तो देश म्हणजे दक्षिण आफ्रिका होय. दक्षिण आफ्रिकेचे अनेक दिग्गज खेळाडू हे आयपीलमध्ये खेळत असतात. अगदी 2008 साली जेव्हापासून आयपीएल सुरु झाले तेव्हापासून आफ्रिकेच्या खेळाडूंनी आयपीएलचे मैदान गाजवले आहे. पण यंदाच्या वर्षी आफ्रिकेतील लोकांना आयपीएल पाहता येणार नाही.

PHOTOS : पंतप्रधान मोदींची नव्या संसदेला भेट; कशी असणार रचना

आयपीएलची सुरुवात ही 2008 साली झाली तेव्हापासून मागच्यावर्षीपर्यंत आफ्रिकेतील लोकांना आयपीएल पाहता येत होते. ईएसपीएनक्रिकइंफोने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, दक्षिण आफ्रिकेमधील मुख्य ब्रॉडकास्टर असलेल्या शुमार सुपरस्पोर्टने यंदाच्या वर्षी आयपीएल ब्रॉडकास्टचे राइट्स विकत घेतलेले नाहीत. यापूर्वी सुपरस्पोर्टने आयपीएलच्या एकुण 15 सीजनचे ब्रॉडकास्ट राइट्स खरेदी केले होते. परंतु त्यांनी मागच्या वर्षी जूनमध्ये वायकॉम 18 कडून हे अधिकार गमावले आहेत.

PHOTOS : पंतप्रधान मोदींची नव्या संसदेला भेट; कशी असणार रचना

सुपरस्पोर्टने वायकॉम 18 कोणताही करार केला नसल्यामुळे सुपरस्पोर्टकडे आता आयपीएल दाखवण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. त्यामुळे आफ्रिकेतील 6 कोटी लोक आयपीएल पाहू शकणार नाही. दरम्यान, आफ्रिकेचे 10 खेळाडू यंदा आयपीएल खेळणार आहेत. आफ्रिकेचा फलंदाज अॅडम मार्करम हा सनरायजर्स हैद्रबाद संघाचा कर्णधार देखील आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube