IPL 2023: हैदराबादविरुध्द शुभमन गिलने ठोकले शतक, गुजरातचा धावांचा डोंगर
IPL 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमनेसामने आले होते. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 188 धावा केल्या. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबादला सामना जिंकण्यासाठी 189 धावांचे लक्ष्य मिळाले. गुजरात टायटन्सकडून सलामीवीर शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. शुभमन गिलने 58 चेंडूत 101 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 2 षटकार मारले. तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
शुभमन गिलशिवाय साई सुदर्शनने 36 चेंडूत 47 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. मात्र, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्याशिवाय गुजरात टायटन्सचे उर्वरित फलंदाज फारसे योगदान देऊ शकले नाहीत. सलामीवीर ऋद्धिमान साहा एकही धाव न काढता बाद झाला. तर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने 6 चेंडूत 8 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी डेव्हिड मिलर 5 चेंडूत 7 धावा करून टी. नटराजनचा बळी ठरला. राहुल तेवतियाला फझलहक फारुकीने 3 चेंडूत 3 धावा करून बाद केले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील का? फडणवीसांनी दिले थेट उत्तर
एकेकाळी गुजरात टायटन्स 200 धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते, पण हार्दिक पांड्याच्या संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. वास्तविक, 15 षटकांनंतर गुजरात टायटन्सची धावसंख्या 2 बाद 156 अशी होती, परंतु शेवटच्या 5 षटकांत सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. विशेषत: भुवनेश्वर कुमारने अप्रतिम गोलंदाजी केली. त्यामुळे गुजरात टायटन्सची धावसंख्या 188 धावांवर थांबली. अशाप्रकारे हार्दिक पांड्याच्या संघाला 200 धावांचा आकडा पार करता आला नाही.
अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कारवाई होणार; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
भुवनेश्वर कुमारच्या शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सचे 4 खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले, त्यात एक धावबादही होता. गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने शतक झळकावले. याशिवाय सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजीचे दर्शन घडवले. त्याचवेळी गुजरात टायटन्सच्या फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला.