IPL 2023 MI vs GT: मुंबई इंडियन्सचे दुर्दैव! असे झाले नसते तर संघाने गाठली असती अंतिम फेरी

  • Written By: Published:
IPL 2023 MI vs GT: मुंबई इंडियन्सचे दुर्दैव! असे झाले नसते तर संघाने गाठली असती अंतिम फेरी

IPL 2023 MI vs GT:  आयपीएल 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरातने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईचे नशीब खराब होते. सामन्यादरम्यान त्यांचे तीन खेळाडू जखमी झाले होते. याचा परिणामांवरही काही प्रमाणात झाला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाली आहे.

मुंबईच्या खेळाडूंना दुखापत झाली नसती आणि एकूणच कामगिरी चांगली झाली असती तर निकाल वेगळा लागला असता. मुंबईला अंतिम फेरी गाठण्यासाठी गुजरातचा फलंदाज शुभमन गिलला रोखणे आवश्यक होते. 129 धावांची जबरदस्त इनिंग खेळून शुभमन बाद झाला. या खेळीमुळे गुजरातने 233 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना मुंबईचे खेळाडू केवळ 171 धावाच करू शकले.

अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्वालिफायरदरम्यान मुंबईचे तीन खेळाडू जखमी झाले होते. क्षेत्ररक्षणादरम्यान सलामीवीर इशान किशनला दुखापत झाली. ख्रिस जॉर्डनचा कोपर त्याच्या डोळ्याला लागला. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला मैदानाबाहेर जावे लागले. यानंतर इशान फलंदाजीसाठीही आला नाही. त्याच्या अनुपस्थितीत विष्णू विनोदला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. रोहितसोबत नेहल वढेरा सलामीला आला. तो 4 धावा करून बाद झाला.

चेन्नईचे फायनलसाठी ‘घातक’ अस्त्र तयार, प्रत्येक मोठ्या सामन्यात दाखवतोय ताकद

कर्णधार रोहितही जखमी झाला. त्याच्या हाताला दुखापत झाली. मात्र, असे असतानाही तो फलंदाजीसाठी मैदानात आला. पण अवघ्या 8 धावा करून बाद झाला. कॅमेरून ग्रीन हा दुखापतग्रस्त संघाचा तिसरा खेळाडू होता. हार्दिक पांड्याच्या षटकात चेंडू लागल्याने ग्रीन जखमी झाला. त्यानंतर तो निवृत्त झाला. नंतर मधल्या फळीत फलंदाजीला आला असला तरी. ग्रीनने 30 धावांची खेळी खेळली. अशाप्रकारे दुखापतीमुळे मुंबईचा खेळ मोठ्या प्रमाणात बिघडला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube