सिंगापूरच्या मिनचा पराभव करत पीव्ही सिंधू स्पेन मास्टर्सच्या अंतिम फेरीत
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने सिंगापूरच्या येओ जिया मिनचा पराभव करत स्पेन मास्टर्सच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शनिवारी 48 मिनिटे रंगलेल्या सामन्यात सिंधूने मिनचा 24-22, 22-20 असा पराभव केला. दोघीमध्ये तुल्यबळ लढत झाली, पण शेवटी भारतीय खेळाडूने बाजी मारली. नुकतेच बॅडमिंटन क्रमवारीत टॉप-10 मध्ये आपले स्थान गमावलेल्या सिंधूने उपांत्य फेरीत चांगली कामगिरी केली. सिंधूने प्रतिस्पर्धकाला कोणतीही संधी न देता सलग दोन गेममध्ये सामना संपवला.
सिंधूचा आघाडीवरच होती
या सामन्यापूर्वी सिंधूचा वरचढ असल्याचे मानले जात होते. या सामन्यापूर्वी सिंधू आणि येओ जिया मिन तीन वेळा आमनेसामने आले होते, सिंधूने तिन्ही वेळा विजय मिळवला होता. या दोन्ही खेळाडूं शेवटचा सामना
बर्मिंगहॅममधील 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत झाली होती, जिथे सिंधूने 21-19, 21-17 असा विजय मिळवला होता. आता दोन्ही खेळाडूंचा विक्रम 4-0 असा झाला आहे.
छ. संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या सभेसाठी पोलिसांच्या अटी – शर्ती
या वर्षी पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचली सिंधू
यावर्षी कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची सिंधूची ही पहिलीच वेळ आहे. दुस-या मानांकित सिंधूला प्रदीर्घ दुखापतीतून परतल्यानंतर लय शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि यावर्षी गेल्या काही स्पर्धांमध्ये तिला दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही.
या वर्षाच्या सुरुवातीला सिंधू सलग तिसऱ्यांदा स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडली होती. या वर्षी जानेवारीमध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंड ओपन, मलेशिया ओपन आणि इंडिया ओपनच्या पहिल्या फेरीतून ती बाहेर पडली होती.