ऋतुराज गायकवाडने चेन्नईचा डाव सावरला, गुजरातसमोर 173 धावांचे आव्हान
IPL 2023 Qualifier 1 : आयपीएल 2023 चा पहिला क्वालिफायर सामना चेन्नईतील चेपॉक मैदानावर चेन्नई आणि गुजरात यांच्यात सुरु आहे. गुजराच कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऋतुराज गायकवाडच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने निर्धारित 20 षटकात 172 धावांपर्यंत मजल मारली. अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी गुजरातसमोर 173 धावांचे आव्हान आहे.
CSK ने 20 षटकात 7 गडी गमावून 172 धावा केल्या. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. गुजरातकडून शमी आणि मोहित शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले. आजच्या सामन्यात धोनी अपयशी ठरला. धोनी अवघी एक धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. 155 च्या स्कोअरवर CSK ने 6 विकेट गमावल्या होत्या. कॉनवे 40 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अजिंक्य रहाणेही चांगली कामगिरी करू शकला नाही. रहाणे 10 चेंडूत 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
एमएस धोनीने संघात कोणतीही बदल केला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे. दुसरीकडे मोक्याच्या सामन्यात हार्दिक पांड्याने संघात एक बदल केला होता. दर्शन नळकांडे याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले आहे.
चेन्नई सुपर किंग्जची प्लेईंग 11
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तिक्ष्णा
गुजरातची प्लेईंग 11
हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवाटिया, रशीद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी