CSK vs MI : 4 सामने 5 धावा… हिटमॅन रोहित पुन्हा शून्यावर बाद, केला लाजिरवाणा विक्रम नावावर
CSK vs MI : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2023 चा 49 वा सामना शनिवार, 6 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. एल क्लासिकोमध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्ससाठी प्रथम फलंदाजी करताना डावाची सुरुवात खराब झाली. संघाच्या 3 विकेट अवघ्या 14 धावांत पडल्या. त्याचवेळी एमआयचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला. हिटमॅनचा फॉर्म आता मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
रोहित शर्मा पुन्हा एकदा शून्यावर बाद
आयपीएल 2023 मध्ये रोहित शर्माची बॅट पूर्णपणे शांत झाली आहे. त्याचा फॉर्म आता मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी ठरला आहे. पंजाबविरुद्धच्या गेल्या सामन्यातही रोहित शून्यावर बाद झाला होता. हिटमॅनने आयपीएलमध्ये गेल्या 4 सामन्यांमध्ये फक्त 5 धावा केल्या आहेत. याशिवाय या संपूर्ण सीझनबद्दल बोलायचे झाले तर रोहितने 10 मॅचमध्ये केवळ 184 धावा केल्या आहेत.
सीमाभागातील जनतेला सोडून दोन मंत्री कोणत्या बिळात लपले? राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
आयपीएलमध्ये हिटमॅनच्या नावावर लाजिरवाणा विक्रम
रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शून्यावर बाद होऊन आयपीएलमध्ये एक लाजिरवाणा विक्रम केला आहे. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू बनला आहे. रोहित आतापर्यंत आयपीएलमध्ये 16 वेळेस शून्यावर बाद झाला आहे. जी आयपीएलमधील कोणत्याही खेळाडूची सर्वाधिक आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दिनेश कार्तिक आहे,जो आयपीएलमध्ये 15 वेळेस शून्यावर बाद झाला आहे.
.