Sachin Tendulkar : त्या रात्री मी झोपलो नव्हतो; सचिनने सांगितला पाकिस्तानविरुद्धच्या मॅचचा किस्सा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 03T182920.803

Sachin Tendulkar On 2003 Pakistan World Cup Match :  सचिन तेंडूलकर या नावाने समस्त भारतीयांना क्रिकेटचं वेड लावलं. त्याची बॅटींग पाहण्यासाठी लोक दिवस-दिवस वाट पहायचे. 90 च्या दशकामध्ये तर त्याने केलेल्या फलंदाजीमुळे अनेक मुलं ही क्रिकेट या खेळाकडे वळली. ज्या काळातमध्ये इतर सर्व फलंदाज हे 50 स्ट्राईक रेटने बॅटींग करायचे तेव्हा सचिन 100 च्या स्ट्राईक रेटने खेळत होता. त्यामुळे त्याची फलंदाजी पाहणे हे क्रिकेट रसिकांसाठी विशेष पर्वणी असायची.

त्यातच जर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना असेल तर मग विचारायलाच नको. क्रिकेटचे स्टेडिअम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले असायचे. संपूर्ण मैदानात फक्त सचिन-सचिन अशी आरोळी प्रेक्षक द्यायचे. प्रेक्षकांच्या या गर्दीच्या समोरच्या संघावरदेखील तितकाच परिणाम व्हायचा. भारत विरुद्ध पाकिस्तान यांची 2003 वर्ल्डकपमधील झालेली ती मॅच कोणताही क्रिकेटचा चाहता विसरु शकणार नाही.

Letsupp Special : राहुल गांधींसोबत नानांची रिलॅक्स भेट; पदाचे टेन्शन गेले!

पाकिस्ताने भारतासमोर 274 धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. सईद अन्वरने केलेल्या 101 धावांमुळे पाकिस्तानने 273 धावा केल्या होत्या. सचिनने या सामन्यात केलेल्या धुवाधार 98 धावांमुळे भारताने हा सामना सहज जिंकला. नुकताच सचिनने याविषयीचा एक किस्सा सांगितला आहे. सामन्याचा अगोदरच्या रात्री मला झोप देखील आली नव्हती, असे सचिनने सांगितले आहे.

भारतामध्ये एक वर्षापुर्वी तेव्हा या सामन्यावरुन वातावरण तयार झाले होते. पाकिस्ताविरुद्धचा सामना जिंका बाकी सामने हरले तरी चालतील असे तेव्हा वातावरण तयार झाले होते. पण आम्हाला सर्व सामने जिंकायचे होते. त्यावेळी लोकांच्या भावना या अतिशय तीव्र झाल्या होत्या. त्या सामन्याच्या प्रेशरला कसे हँडल करायचे याचा विचार आम्ही करत होतो. त्यामुळे रात्रभर झोप देखील लागली नाही, असे सचिनने सांगितले आहे.

Arvind Savant यांच्या रिक्षावाल्याच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…

त्यांनी 274 धावा केल्यावर लवकर विकेट गमावू नये हा आमचा प्रयत्न होता. त्यावेळी सेहवाग आणि मी फिल्डवर मोठ्या-मोठ्याने बोलत होतो. जेणेकरुन पाकिस्तानचे प्लेअरसोबत माईंडगेम खेळू शकू. ज्याबाजूने बॉल येईल तिकडे शॉट खेळायचे असे आम्ही ठरवले होते, असे सचिनने सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube