टुक-टुक खेळणारा शुभमन गिल कसा झाला धडाकेबाज फलंदाज, शतकानंतर उघडले गुपित
सुमारे एक वर्षापूर्वी शुभमन गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकाच्या आसपास गेला की आऊट होत असे. वडील आणि प्रशिक्षक लखविंदर सिंग यामुळे नाराज होते. शुभमनने गेल्या वर्षी झिम्बाब्वेविरुद्ध वनडेत शतक झळकावले आणि त्यानंतर त्यांने कधी माघे वळून पाहीले नाही. तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक असलेला शुभमन हा आयपीएल 2023 मध्ये ज्या फॉर्ममध्ये त्याला आता ‘शो-मॅन’ गिल म्हटले जाते. त्याने क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्स (GT vs MI) विरुद्ध शतक केले, जे त्याचे या मोसमातील तिसरे शतक आहे. या शतकाच्या जोरावर टायटन्सने 3 बाद 233 धावांची मजल मारली. मुंबई इंडियन्सचा डाव केवळ 171 धावांवर आटोपला.
गिलने स्वतः वर केले काम
शुभमन गिल या आयपीएलमध्ये 156 च्या स्ट्राइक रेटने धावा करत आहे. गेल्या मोसमात त्याचा स्ट्राइक रेट 132 होता आणि त्याआधी तो 119 होता. आयपीएलच्या या मोसमापूर्वी त्याचे एकही शतक झाले नव्हते. मग गिलच्या कामगिरीत असा बदल कसा झाला. सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर 23 वर्षीय गिल म्हणाला, ‘गेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यापासून मला वाटते की मी गीअर्स बदलण्यास सुरुवात केली. गेल्या आयपीएलपूर्वी मला दुखापत झाली होती पण मी माझ्या खेळावर काम करत राहिलो.
चेन्नईचे फायनलसाठी ‘घातक’ अस्त्र तयार, प्रत्येक मोठ्या सामन्यात दाखवतोय ताकद
5 हंगामात 47 षटकार मारले
शुभमन गिलने 2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2018 ते 2022 या कालावधीत गिलच्या बॅटमधून एकूण 47 षटकार निघाले. या मोसमात त्याने 33 षटकार मारले आहेत. यापूर्वी एका मोसमात, त्याने 2021 मध्ये KKRसाठी सर्वाधिक 12 षटकार ठोकले होते. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात गिलने 10 षटकार ठोकले होते.