टीम इंडियाचा पुढचा सुपरस्टार शुभमन गिल आशियाबाहेर सतत फ्लॉप होतोय, पाहा आकडे

  • Written By: Published:
टीम इंडियाचा पुढचा सुपरस्टार शुभमन गिल आशियाबाहेर सतत फ्लॉप होतोय, पाहा आकडे

अंडर-19 विश्वचषक, देशांतर्गत क्रिकेट आणि नंतर आयपीएलमध्ये आपली फलंदाजीच्या जीवावर टीम इंडियात स्थान मिळवणारा शुभमन गिल आशियाबाहेर सतत फ्लॉप होत आहे. शुभमन गिलने भारतासाठी बहुतेक ओपनिंग केले असले तरी वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत तो तिसऱ्या क्रमांकावर खेळत आहे. (Shubman Gill Who Is Called Next Superstar Of Team India Is Continuously Flopping Outside Asia)

IPL 2023 मध्ये शुभमन गिलची बॅट जोरदार बोलली. त्याने एकहाती आपला संघ गुजरात टायटन्सला अंतिम फेरीत नेले. यापूर्वी त्याने वनडेत द्विशतक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत शतक झळकावले होते. यासोबतच त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्येही शतक झळकावले आहे. मात्र, गिलने हे सर्व पराक्रम आशिया खंडात खेळताना केले आहेत.

आता आशियाबाहेर बोलायचे झाले तर गिलची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत गिल दोन्ही वेळा फ्लॉप ठरला. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 6 तर दुसऱ्या सामन्यात 10 धावा केल्या.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

शुभमन गिलचे आशिया बाहेरील आकडे

शुभमन गिलने आतापर्यंत आशियाबाहेर एकही शतक झळकावलेले नाही. आशियाच्या बाहेर, शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी, वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी एक कसोटी खेळला आहे.

आशियाबाहेर आतापर्यंत शुभमन गिलने 10 कसोटीत केवळ 363 धावा केल्या आहेत, ज्यात त्याच्या बॅटमधून केवळ दोन अर्धशतके झळकली आहेत. त्याचा आशियाबाहेरचा विक्रम खूपच निराशाजनक आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही शुभमन गिल फ्लॉप ठरला होता. विजेतेपदाच्या सामन्याच्या दोन्ही डावात गिल केवळ 13 आणि 18 धावा करू शकला. गिलने आतापर्यंत भारतासाठी 18 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 31.23 च्या सरासरीने 937 धावा केल्या आहेत ज्यात दोन शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube