World Cup 2023 आधी इंग्लंडला मोठा झटका; ‘या’ स्टार खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

World Cup 2023 आधी इंग्लंडला मोठा झटका; ‘या’ स्टार खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Steven Finn Retirement : यंदाच्या विश्वचषकापूर्वीच इंग्लंड क्रिकेट संघाला (England Cricket Team)मोठा फटका बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनने (Steven Finn)आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या खेळाडूने 18 वर्षांच्या आपल्या यशस्वी कारकिर्दिला निरोप दिला आहे. स्टीव्हन फिन हा काही दिवसांपासून दुखापतग्रस्त होता, त्यामुळेच त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्टीव्हन फिनने 2017 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

Atul Chordia : ‘शरद पवार ते डोनाल्ड ट्रम्प’ यांच्याशी घनिष्ठ संबंध राखून असलेले उद्योगपती

स्टीव्हनच्या कारकिर्दित तीनवेळा अॅशेस मालिका जिंकल्या आहेत. 2010 ते 2017 दरम्यान 36 कसोटी सामने खेळून 69 एकदिवसीय सामन्यात 125 बळी, 69 एकदिवसीय सामन्यात 102 बळी आणि 21 टी-20 सामन्यामध्ये 27 बळी घेतले आहेत.

Ahmedangar News : कारचालकाचा ताबा सुटल्याने ट्रकला जोरदार धडक! अपघातात दोघे ठार तर तिघे जखमी…

स्टीव्हनने शेवटचा वनडे सामना 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो त्याच्या फिटनेसमुळे मैदानाबाहेरच राहिला. त्यानंतर आता अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. स्टीव्हनच्या निर्णयानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे.

2023 च्या विश्वचषकापूर्वीच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनने क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय घेताना त्याने म्हटले आहे की, आज मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून तत्काळ निवृत्ती घेत आहे. मी गेल्या एक वर्षापासून माझ्या शरीराला झालेल्या दुखापतीशी लढत आहे. त्याचबरोबर मी आता हार मानली आहे.

स्टीव्हनने सांगितले की, 2005 मध्ये मिडलसेक्ससाठी पदार्पण केल्यापासून माझा प्रवास सोपा नव्हता. इंग्लंडसाठी 36 सामने कसोटीसह 125 सामने खेळणे हे माझ्या स्वप्नांच्या पलिकडे होते. त्याचबरोबर शेवटी स्टीव्हनने आपल्या चाहत्यांना आपण यापुढे खेळणार नसल्याचे सांगतानाच त्यांची माफीही मागितली आहे.

स्टीव्हन फिन वयाच्या 16 व्या वर्षी काउंटी क्रिकेट खेळला. 2009 मध्ये त्याने मिडलसेक्स संघासाठी 53 विकेट घेतल्या. त्यानंतर तो जखमी झाला. फिनने 2010 मध्ये बांग्लादेशविरुद्ध इंग्लंडकडून कसोटीत पदार्पण केले. त्यामध्ये त्याने 4 विकेट घेतल्या आणि इंग्लंडने मालिका 2-0 ने जिंकली. त्याचवर्षी स्टीव्हनने आपल्या मायदेशातच सहा कसोटी सामने खेळले. त्यात त्याने बांग्लादेशविरुद्ध पाच विकेट घेतल्या. स्टीव्हनने 2011 मध्ये वनडेत पदार्पण केले आणि 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना खेळला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube