IPL 2023: तुषार देशपांडेचा मोठा खुलासा, कसे धोनीने संघात….

  • Written By: Published:
IPL 2023: तुषार देशपांडेचा मोठा खुलासा, कसे धोनीने संघात….

चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2023 चा विजेता ठरला. या संघाने अंतिम सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. 28 मे रोजी होणारा अंतिम सामना पावसामुळे 29 मे रोजी (रिझर्व्ह डे) खेळला गेला. या दिवशीही पाऊस पडला असला तरी, त्यानंतर चेन्नईने डकवर्थ लुईस नियमानुसार जेतेपदाचा सामना 5 विकेटने जिंकला. आता दरम्यान, चेन्नईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने एक मोठा खुलासा केला आहे.

चेन्नईचा स्टार वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे महागडा गोलंदाज असल्याचे सिद्ध झाल्यानंतरही संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याला संघात असण्याची हमी कशी दिली याचा खुलासा केला. तुषार देशपांडे या मोसमात काहीसा महागडा ठरला, पण त्याने संघासाठी सर्वाधिक 21 बळी घेतले. यासह तुषारने या मोसमातील पहिल्या साखळी सामन्यापासून अंतिम फेरीपर्यंत चेन्नईसाठी सर्व सामने खेळले.

दुसरीकडे, तुषार देशपांडे यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, “एकदा मी चांगली गोलंदाजी केली नाही, तेव्हा एमएस धोनी आला आणि म्हणाला की नवीन प्रभावशाली खेळाडू नियमानुसार, 200+ धावा करणे मोठी गोष्ट नाही. आणि तो म्हणाला की तू तुज्या जागेची चिंता करू नकोस. तरुण खेळाडूंना आवश्यक असलेली सुरक्षा त्याने मला दिली.

आयपीएल डॉट बॉल, बीसीसीआय आता किती झाडं लावणार?

संघातील सर्वात महागडा गोलंदाज असल्याचे सिद्ध झाले

चेन्नईकडून सर्वाधिक विकेट घेण्यासोबतच तुषार देशपांडे सर्वाधिक धावा घेणारा गोलंदाज ठरला. त्याने संपूर्ण हंगामात 16 सामन्यांमध्ये 56.5 षटके टाकली आणि 9.92 च्या इकॉनॉमीने 564 धावा दिल्या. यादरम्यान त्याने 21 विकेट्सही घेतल्या.

तुषार देशपांडेची आतापर्यंतची आयपीएल कारकीर्द

तुषार देशपांडेने 2020 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले, तेव्हापासून तो या स्पर्धेत 23 सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना तुषारने 32.76 च्या सरासरीने 25 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्यांची इकॉनॉमी 10.13 राहिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube