टीम इंडियाचा पराक्रम! 50 धावांनी विजय अन् सेमी फायनल पक्की; बांग्लादेशचं पॅकअप
IND vs BAN : टीम इंडियाने शनिवारी दमदार खेळ (IND vs BAN) करत बांग्लादेशवर 50 धावांनी विजय मिळवला. फलंदाजी आणि गोलंदाजीत (T20 World Cup) भारताच्या वाघांनी जबरदस्त कामगिरी केली. गोलंदाजांनी तर बांग्लादेशच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. या विजयामुळे सेमी फायनल फेरीत प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. याआधी सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा (Team India) पराभव केला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशला वीस (Bangladesh) ओव्हर्समध्ये फक्त 146 धावा करता आल्या.
सर विवियन रिचर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने विजयासह गुणतालिकेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. सलग दोन विजयामुळे चार गुण झाले आहेत आणि नेट रनरेटही +2.425 इतका झाला आहे. आता टीम इंडियाचा पुढील सामना सोमवारी बलाढ्य ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकल्यानंतर भारत सेमी फायनलमध्ये प्रवेश घेईल. तसाही बांग्लादेशवरील विजयानंतर भारताने सेमी फायनलमध्ये प्रवेश घेतलाच आहे.
Team India Australia Tour : टीम इंडिया-ऑस्ट्रेलियाच्या कसोटीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा
ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. आता पाहिला क्रमांक मिळवायचा असेल तर कांगारूंना अफगाणिस्तान विरुद्ध मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अफगाणिस्तान आणि बांग्लादेश आहे. परंतु, आता या पराभवानंतर बांग्लादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या संघााठी सेमी फायनलचे दरवाजे बंद झाले आहेत.
भारताने दिलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेशच्या फलंदाजांनी विशेष काही केले नाही. पहिल्या विकेटसाठी लिटन दास आणि तंजीद यांच्यात 35 धावांची भागीदारी झाली. यानंतर लिटन 13 धावा करून बाद झाला. तंजीदला कुलदीप यादवने बाद केले. बांग्लादेशच्या डावात कर्णधार वगळता एकही फलंदाज विशेष काही करू शकला नाही. भारतीय गोलंदाजी समोर बांग्लादेशच्या फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली.
कुलदीप यादवने तीन विकेट घेतल्या तर अर्शदीप आणि बुमराह (Jassprit Bumrah) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्यानेही (Hardik Pandya) एक विकेट घेतली. या सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. भारतीय फलंदाजांनी बांग्लादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. भारताने 196 धावा केल्या. या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
या सामन्यात भारताची सुरुवात चांगली राहिली. रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकरच बाद झाला. अनेक दिवसांपासून शांत असलेला विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यात चांगलं खेळला. त्याने 24 चेंडूत 36 रन केले. हार्दिक नंतर विराटने या सामन्यात सर्वाधिक रन केले. शिवम दुबेनेही हार्दिकला चांगली साथ दिली. त्याने 34 धावा केल्या. एक वेळ असे वाटत होते की भारत 200 पार करील मात्र बांग्लादेशच्या गोलंदाजांनी त्यांनी 197 वरच रोखले.
टी20 वर्ल्डकपआधीच विंडीजला झटका; अनुभवी खेळाडूवर ICC कडून 5 वर्षांची क्रिकेटबंदी