T20 World Cup 2026 पूर्वीच आयसीसीला मोठा धक्का; JioStar ने 3 अब्ज करारातून घेतली माघार, कारण काय?

T20 World Cup 2026 : फेब्रुवारी 2026 मध्ये भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषकासाठी आयसीसीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.

  • Written By: Published:
T20 World Cup 2026

T20 World Cup 2026 : फेब्रुवारी 2026 मध्ये भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषकासाठी आयसीसीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. नुकतंच या स्पर्धेचे आयसीसीने वेळापत्रक देखील जारी केले आहे. या वेळापत्रकानुसार भारतीय संघ कोलंबो येथे 15 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. मात्र त्यापूर्वीच एक मोठी अपडेटसमोर आली या अपडेटनुसार आयसीसीला मोठा फटका बसला आहे.

7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2026) जिओस्टारने (JioStar) 3 अब्ज करारातून माघार घेतली आहे. माहितीनुसार, जिओस्टारने आयसीसीच्या प्रशासकीय मंडळाला सांगितले आहे की ते त्यांच्या तीन वर्षांच्या भारत मीडिया हक्क कराराची उर्वरित दोन वर्षे पूर्ण करू शकत नाही.

इकॉनॉमिक टाईम्समधील एका वृत्तानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज-नियंत्रित ब्रॉडकास्टर (जिओस्टार) ने 2027 पर्यंत चालणाऱ्या 3 अब्ज डॉलर्सच्या कराराचे काम पूर्ण करण्यास असमर्थतेचे मुख्य कारण वाढत्या आर्थिक तोट्याचे कारण सांगितले आहे. जिओस्टारच्या अचानक बाहेर पडण्याचे कारण प्लॅटफॉर्मला होणारे मोठे आर्थिक नुकसान असल्याचे म्हटले जाते.

आयसीसीने2026-29 च्या चक्रासाठी भारताच्या मीडिया हक्कांसाठी एक नवीन विक्री प्रक्रिया आधीच सुरू केली आहे, ज्यामध्ये अंदाजे 2.4 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मागणी आहे. मात्र आता जिओस्टारने माघार घेतल्याने आयसीसीच्या योजनांना अडथळा निर्माण झाला आहे. 2024-27  या कालावधीसाठी जिओस्टारने स्वाक्षरी केलेल्या कराराची किंमत $3 अब्ज होती, कारण त्यात दरवर्षी किमान एक प्रमुख पुरुष क्रिकेट स्पर्धा समाविष्ट होती. जिओस्टारच्या बाहेर पडल्यानंतर, आयसीसीने अनेक प्रमुख प्लॅटफॉर्मना आमंत्रणे पाठवली आहेत.

उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार अन् आरोग्यात होणार सुधारणा; जाणून घ्या ‘या’ राशींसाठी 9 डिसेंबर कसा राहणार ?

follow us