अजब योगायोग! 2007 च्या विनिंग टीम इंडियातील दहा खेळाडू निवृत्त पण, मैदानाबाहेर…
T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषकाचा थरार रविवारपासून सुरू होत (T20 World Cup 2024) आहे. यंदा विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडीज या दोन देशांत होत आहे. पहिल्यांदाच 20 क्रिकेट संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. या स्पर्धेचा इतिहास पाहिला तर पहिला वर्ल्डकप भारताने जिंकला होता. आता या गोष्टीला सोळा वर्षांचा मोठा काळ उलटून गेला आहे. यानंतर भारताला पुन्हा अशी कामगिरी करता आली नाही. यानंतरचा दुसरा वर्ल्डकप पाकिस्तानने जिंकला होता. तिसरा वर्ल्डकप इंग्लंडने जिंकला होता. त्यानंतर 2022 मध्येही इंग्लंड संघाने पाकिस्तानचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरल होतं.
सन 2012 मध्ये विंडीजने पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला. यानंतर 2016 मध्ये सुद्धा वेस्टइंडिजच विजेता ठरला. 2014 मध्ये श्रीलंकेने टीम इंडियाचा पराभव करत विश्वचषक आपल्या नावे केला होता. 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथमच विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत कांगारू संघाने ही कामगिरी केली होती.
T20 World Cup : आयसीसीने केली सराव सामन्यांची घोषणा; टीम इंडिया ‘या’ संघाला देणार टक्कर
2007 नंतर 2014 मध्ये भारतीय संघासाठी वर्ल्डकप जिंकण्याची संधी चालून आली होती. यावेळी टीम इंडिया स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती. परंतु या संधीच सोनं करणं त्यांना जमलं नाही. 2007 मधील विजेत्या संघाबद्दल बोलायचं झालं तर या संघातील एक खेळाडू वगळता सर्व खेळाडू क्रिकेटमधून रिटायर्ड झाले आहेत.
आता हा योगायोगच म्हणावा लागेल की या दहा खेळाडूंपैकी एकही खेळाडूला मैदानातून निवृत्त होण्याची संधी मिळाली नाही. गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा, युवराज सिंह, युसुफ पठाण, एमएस धोनी, रोहित शर्मा, इरफान पठाण, हरभजन सिंह, जोगिंदर शर्मा, एस श्रीसंत, आरपी सिंह या खेळाडूंमध्ये फक्त रोहित शर्माच अजून रिटायर्ड झालेला नाही.
एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी सोशल मीडियावर आपल्या रिटायरमेंटची घोषणा केली होती. त्याच्या व्यतिरिक्त गंभीर, युसुफ, उथप्पा, युवराज, हरभजन, इरफान, जोगिंदर, श्रीसंत आणि आर पी सिंह यांच्यातील कुणालाच मैदानावर रिटायर्ड होण्याची संधी मिळाली नाही. 2007 मधील टी 20 विश्वचषकाच्या फायनल सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात गौतम गंभीरने 75 धावांची खेळी केली होती. रोहित शर्मा 30 रन बनवून नाबाद राहिला होता.
T20 विश्वचषकात टीम इंडिया ‘या’ दोन संघांविरुद्ध जिंकलीच नाही; यंदाही आव्हान कायम