आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकली पण, ऑस्ट्रेलियाचं रेकॉर्ड तुटलंच नाही; Team India 3 पावलं मागेच

आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकली पण, ऑस्ट्रेलियाचं रेकॉर्ड तुटलंच नाही; Team India 3 पावलं मागेच

Team India : एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात (IND vs SA ODI) भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. मात्र भारतीय गोलंदाजांपुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी (Team India) गुडघे टेकले. हा सामना भारताने 78 धावांनी खिशात टाकला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने मालिका विजयही नोंदवला. दक्षिण आफ्रिकेतील या विजयाबरोबरच भारतीय संघाने आणखी एक कारनामा केला आहे ज्याची चर्चा होत आहे. एकाच वर्षात सर्वाधिक वनडे सामने जिंकणारा भारत हा दुसरा संघ ठरला आहे. 2023 या एकाच वर्षात टीम इंडियाने 27 सामने जिंकले आहेत. येथेही ऑस्ट्रेलिया भारताच्या पुढे आहे. ऑस्ट्रेलियाने 2003 या वर्षात 30 वनडे सामने जिंकले आहेत. हा रेकॉर्ड तोडणे भारताला शक्य झाले नाही.

IND vs SA : टीम इंडियाचा पराक्रम! आफ्रिकेला धूळ चारत मालिकाही जिंकली

आता 2023 या वर्षातील भारतीय संघाचे सर्व एकदिवसीय सामने संपले आहेत. या वर्षात भारताने 27 सामने जिंकले आहेत. एक नवा विक्रम भारतीय संघाने केला आहे. मात्र हा विक्रम होत असताना भारताला ऑस्ट्रेलियाचं रेकॉर्ड काही मोडता आलं नाही. ऑस्ट्रेलियानं 2003 या एकाच वर्षात सर्वाधिक 30 सामने जिंकले होते. त्यानंतर हे रेकॉर्ड मोडण्याची संधी भारताला मिळाली होती. विश्वचषकातील साखळी फेरीतील सलग 10 सामने भारताने जिंकले होते. त्यामुळे भारत हे रेकॉर्डही मोडेल असे वाटत होते. परंतु, फायनल सामन्यात भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने भारताची ही विजयी घोडदौड रोखली.

ऑस्ट्रेलियाने सन 2003 मध्ये एकाच वर्षात 30 सामने जिंकले होते. त्यानंतर भारताने 2023 या एकाच वर्षात 27 सामने जिंकत दुसरा क्रमांक मिळवला. 1999 मध्येही ऑस्ट्रेलियाने एकाच वर्षात 26 सामने जिंकले होते. त्यानंतर 1996 मध्ये 25 आणि 2000 मध्ये 25 सामने दक्षिण आफ्रिका संघाने जिंकले होते. 2023 मध्ये भारतीय संघाने सर्वाधिक वनडे सामने जिंकण्याचा मान मिळवला असला तरी 2003 मधील ऑस्ट्रेलिया संघाचं रेकॉर्ड तोडणं शक्य झालं नाही. त्यामुळे एका वर्षात सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकण्याच्या बाबतीत अजूनही ऑस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर कायम आहे.

IND vs SA: संजू सॅमसनचे अखेर पहिले शतक, रिंकू सिंगची फटकेबाजी, आफ्रिकेसमोर मोठी धावसंख्या

टीम इंडियाचा मालिका विजय  

भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना पार्ल बोलँड पार्क येथे खेळवण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करत 296 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसनने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले शानदार शतकही झळकविले. तर तिलक वर्माने 52 धावांची अर्धशतकीय खेळी केली. तर रिंकू सिंगने पुन्हा एकदा डेथ ओवर्समध्ये आपला खेळ दाखविला. त्याने 38 धावांची खेळी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube