IND vs AUS, 3rd Test : पहिली फलंदाजी घेणं टीम इंडिया पडलं महागात !

IND vs AUS, 3rd Test : पहिली फलंदाजी घेणं टीम इंडिया पडलं महागात !

IND vs AUS LIVE Score : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 3rd Test) यांच्यामध्ये सुरु तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया स्वतःच्या जाळ्यात अडकल्याचं दिसून येत आहे. नागपूर आणि दिल्लीप्रमाणे इंदूरमध्ये देखील भारतीय संघ व्यवस्थापनाने फिरकी गोलंदाजाला फायदेशीर अशा प्रकारचा पिच बनल्याची माहिती समोर आली होती. पण इंदूर कसोटीमध्ये पहिली फलंदाजी घेतल्यानंतर भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फिरकीसमोर तोंडावर आपटल्याचे दिसून आलं. टीम इंडिया अर्धासंघ तंबूत परतला असून १०० धावांच्या आतमध्येच टीम इंडियाला ७ गडी गमावले आहेत.

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने सुरुवातीला वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन या दोघांकडे चेंडू सोपवला. भारतीय फलंदाजांनी वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा काढण्यास सुरुवात केली. यामुळे कर्णधार स्मिथ याने आपल्या फिरकीपटूंकडे चेंडू सोपवताच टीम इंडिया ढासळली. एकही विकेट न गमावता २७ धावा केल्यावर भारतीय संघाने पुढील १८ धावामध्ये ५ विकेट गमावले होते.

IND vs AUS, LIVE Score : टीम इंडियाची अवस्था बिकट, अर्धासंघ तंबूत परतला

यानंतर २६ षटकावर भारताची अवस्था ८४ वर ७ बाद अशी झाली. विशेष म्हणजे या सर्व ७ विकेट्स ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी घेतले आहे. मॅथ्यू कुहनेमन आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी ३ तर टॉड मर्फीने १ विकेट घेतली. विराट कोहली ने टॉड मर्फी ला LBW बाद केले. कुहनेमनच्या चेंडूवर श्रेयस अय्यर खाते न उघडताच क्लीन बोल्ड झाला. भारताची चौथी विकेट, भारत ४ बाद ४४ धावा केल्या, तर लायनने ११ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कुहनेमनने त्याला झेलबाद केले.

पुजारा क्लीन बोल्ड, भारत – ३ बाद ३६ धावा केल्या, लायनच्या नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लायनने पुजाराला क्लीन बोल्ड करत आऊट केले. भारताला दुसरा धक्का बसला. कुहनेमनच्या आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शुभमन गिल स्मिथकडून झेलबाद झाला. गिलने २१ चेंडूत १८ धावा केल्या. भारताला पहिला झटका, भारत – १ बाद २७ धावा करण्यात आल्या, कुहनेमनच्या सहाव्या शतकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहित शर्माला कॅरीने स्टंपिंग करत बाद केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube